"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 20:00 IST2025-02-08T19:59:24+5:302025-02-08T20:00:34+5:30
"सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे."

"जनतेनं केजरीवाल यांना मुक्त केलं, आता आरामात..."; दिल्लीच्या निकालावर काय म्हणाल्या स्मृती इराणी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात भाजपला मोठा विजय मिळाला आहे. यासंदर्भात, पक्षाने अत्यंत उत्तम कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या स्मृती इराणी यांची दिली आहे. त्या म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आपण भारतीय राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात आलो आहोत. मात्र तसे करण्यात ते अपयशी ठरले आणि स्वतःच दारू घोटाळ्याचे आरोपी बनले. केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामांनाही विरोध केला. मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानते की, त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि सुशासनावर विश्वास दाखवला."
जनतेने केजरीवाल यांना मुक्त केले... -
माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर आज दिल्लीत एक इतिहास रचला आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानते की, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास दाखवला आणि भाजपला सेवा करण्याची संधी दिली. सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे."
मोदी की गारंटी पर विश्वास कर भाजपा को सेवा का अवसर देने के लिए दिल्लीवासियों का आभार। pic.twitter.com/GrOQ4ncsTd
— Smriti Irani Office (@SmritiIraniOffc) February 8, 2025
केजरीवाल नवी दिल्लीतून पराभूत -
आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रवेश वर्मा यांनी ४,०८९ मतांनी पराभव केला आहे. हा सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वर्मा यांना 30088 मते मिळाली आहेत, केजरीवाल यांना 25999 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना 4568 मते मिळाली आहेत.