शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजप सरकार आलं तर काय-काय मिळणार? अमित शाह यांनी 'संकल्प पत्र पार्ट-3' जारी करत सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 18:17 IST

यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक मैदानात उतरलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ-मोठ्या घोषणा करताना दिसत आहेत. यातच आज (शनिवारी) केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी भाजपचे संकल्प पत्र -३ सादर केले. यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेली अमित शाह म्हणाले, "आज मी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पाचा शेवटचा भाग प्रसिद्ध करत आहे. या ठिकाणी मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही. मात्र, आम्ही जी आश्वासने देतो, ती पूर्ण करतो. अनेकांनी दिलेल्या सूचनांनुसार, हे संकल्प पत्र तयार करण्यात आले आहे." यासंदर्भात सविस्तर बोलताना शाह म्हणाले, "जर भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला, तर १७०० अनधिकृत वसाहतींना संपूर्ण मालकी हक्क दिला जाईल. दिल्लीमध्ये १३००० दुकाने सील आहेत, ती ६ महिन्यांच्या आत पुन्हा खुली केली जातील. निर्वासित वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनींना मालकी हक्क दिले जातील."

अमित शाह पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये भव्य महाभारत कॉरिडोर विकसित केला जाईल. मान्यताप्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि वकिलांना १० लाख रुपयांपर्यंत जीवन विमा आणि १० लाख रुपयांपर्यंत आरोग्य आणि अपघात विमाही दिला जाईल."

यमुना रिव्हरफ्रंट तयार करणार - अमित शहा म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर, आपण साबरमती रिव्हर फ्रंटप्रमाणेच यमुना रिव्हर फ्रंट तयार करणार आहोत. हे काम तीन वर्षांत पूर्ण होईल. अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना शाह म्हणाले, "केजरीवाल म्हणाले होते की ते ७ वर्षांत यमुना पूर्णपणे स्वच्छ करतील आणि दिल्लीतील लोकांसमोर यमुनेत डुबकी मारतील. मी केजरीवालजींना आठवण करून देऊ इच्छितो की केजरीवालजी, लोक आपल्या जगप्रसिद्ध डुबकीची वाट बघत आहेत.

अमित शाह पुढे म्हणाले, "आम्ही तीन वर्षांत यमुना नदी स्वच्छ करणार आणि साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर एक रिव्हरफ्रंट विकसित करणार. मी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कुटुंबाला तीन वर्षांनंतर, यमुनेत डुबकी मारण्यासाठी आमंत्रित करतो"

तरुणांसाठी नोकऱ्या आणि वाहतूक क्षेत्रात गुंतवणूक -भाजपने ५० हजार तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही दिले आहे. याच बोरबर, १३००० बसेस ई-बसमध्ये रूपांतरित केल्या जातील. २०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एकात्मिक सार्वजनिक वाहतूक नेटवर्क, दिल्ली १००% ई-बस शहर बनेल, मेट्रो फेज ४ चे काम लवकरच पूर्ण होईल, मेट्रो आणि बसेस २४x७ उपलब्ध असतील. याशिवाय, टेक्सटाइल वर्कर्सना १० लाख रुपयांचा जीवन विमा आणि ५ लाख रुपयांचा अपघात विमा देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Amit Shahअमित शाहBJPभाजपा