"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:54 IST2025-01-17T18:51:43+5:302025-01-17T18:54:28+5:30
दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे.

"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने गुरुवारी (१७ जानेवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात भाजपने महिलांना दर महिन्याला २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर आता आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधला आहे.
केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, "पीएम मोदी म्हणाले आहेत की (फ्री की रेवडी) खिरापत वाटणे योग्य नाही. ते 100 वेळा म्हणाले आहेत, केजरीवाल खिरापत वाटतात. आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घोषणा केली आहे की, आम्हीही खिरापत देऊ. याता पंतप्रधान मोदींनी घोषणा करावी की, खिरापत योग्य आहे. मोदींनी सांगावे की, आधी जे बोललो ते चूक बोललो. देशाच्या देवाचा प्रसाद आहे."
दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे.
भाजपकडे कुठलाही दृष्टीकोन नाही -
भाजपप्रमाणेच आपणही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर कराल का? असा प्रश्न विचारला असता, केजरीवाल म्हणाले, "आम्हीही करू. भाजप आम आदमी पक्षाच्या आश्वासनांची कॉपी करतो. भाजपकडे स्वतःचे कोणतेही दृष्टिकोन नाही. माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, भाजपचा जाहीरनामा खोटा आहे.