शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या केजरीवालांना विरोध; भाषणादरम्यान स्टेजवरून पडले खाली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2021 14:34 IST

Delhi Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पीडित कुटुंबाला भेटायला आले, तेव्हा त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भयंकर बाब म्हणजे आरोपींनी मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार देखील केले आणि तिच्या कुटुंबाला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच पोलिसांना याबाबत माहिती देऊ नका असं देखील तिच्या कुटुंबीयांना सांगितलं. दिल्ली कंटोनमेंट परिसरातील नांगल गावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच याची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) पीडित कुटुंबाला भेटायला आले, तेव्हा त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं आहे.

अरविंद केजरीवाल यांनी विरोधाचा सामना करत पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री तेथील एका स्टेजवर पोहचले. गर्दीमुळे ते स्टेजवरून खाली पडले. मात्र त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांभाळले. त्यानंतर अरविंद केजरीवाल कारमध्ये बसून निघून गेले.या घटनेवरून भाजपा आणि आप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्ली सरकारने पीडितेच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यासह, आता या प्रकरणाची दंडाधिकारी चौकशी केली जाईल. अरविंद केजरीवाल यांनी "सरकारकडून मोठे वकील लावले जातील. जेणेकरून दोषींना कठोर शिक्षा मिळू शकेल. केंद्र सरकारने दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी कठोर पावले उचलावीत, आम्ही पूर्ण सहकार्य करू" असं म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी रविवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास स्मशानभूमीत असणाऱ्या कूलरमधून थंड पाणी आणण्यासाठी घऱाबाहेर पडली होती. पण घऱातून बाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. जवळपास सहाच्या सुमारास स्मशानमभूमीतील पुजारी आणि पीडितेच्या आईच्या ओळखीतल्या काही जणांनी फोन करुन त्यांना बोलावलं आणि मुलीचा मृतदेह दाखवला. वॉटर कूलरमधून पाणी पित असताना विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला असं त्यांनी पीडितेच्या आईला सांगितलं. यानंतर त्या पुजारी आणि इतर आरोपींनी मुलीच्या आईला पोलिसांना फोन करू नका, नाहीतर यामुळे गुन्हा दाखल होईल आणि पोस्टमॉर्टम करत तिच्या अवयवांची चोरी होईल असं सांगत घाबरवलं. 

दिल्ली हादरलं! 9 वर्षीय मुलीची बलात्कार करुन हत्या, जबरदस्तीने केले अंत्यसंस्कार; परिसरात खळबळ

मुलीच्या हातावर जखमा होत्या तसेच तिचे ओठ निळे पडले होते अशी माहिती मुलीच्या आईने पोलिसांनी दिली आहे. यानंतर महिलेची संमती नसतानाही मुलीवर जबरदस्तीने अंत्यसंस्कार करण्यात आले. महिलेने आपल्या पतीला फोन करुन घटनेची माहिती दिली. यानंतर जवळपास 200 लोक स्मशानभूमीजवळ जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे. क्राइम ब्रांच आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरुन पुरावे जमा केले असून याप्रकरणी तपास सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसIndiaभारत