आधी धडक दिली, नंतर तरुणाला बोनेटवर घेऊन अर्धा किमी ओढत नेलं; धक्कादायक Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 19:10 IST2023-01-14T19:01:23+5:302023-01-14T19:10:27+5:30
दिल्लीत कंझावाला घटनेनंतर तशाच प्रकारची एक घटना राजौरी गार्डन परिसरात घडली आहे.

आधी धडक दिली, नंतर तरुणाला बोनेटवर घेऊन अर्धा किमी ओढत नेलं; धक्कादायक Video व्हायरल...
नवी दिल्ली:दिल्लीतील लोक अजून कंझावाला घटनेलाही विसरले नाही की, अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. हॉर्न वाजवल्याच्या वादातून एका तरुणाला कार चालकाने धडक दिली. दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात ही घटना घडली. धक्कादायक म्हणणजे, कार चालकाने त्या व्यक्तीला बोनेटवर चढवलं आणि अर्धा किलोमीटर गाडी पळवली.
#WATCH | A man was dragged on car's bonnet in Delhi's Rajouri Garden(12.01)
— ANI (@ANI) January 14, 2023
An incident of road rage occured that led to incident shown in video. Case registered under IPC sec 279, 323, 341, 308. Accused identified, being interrogated: Delhi Police
(Visuals confirmed by Police) pic.twitter.com/RdVGuU7QXL
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जानेवारीची आहे. दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात घडलेल्या या रोड रेजच्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कार चालकाविरोधात आयपीसी कलम 279, 323, 341, 308 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉर्न वाजवण्यावरुन हा वाद झाला होता.
बोनेटला लटकलेला तरुण जखमी
कार चालकाने धडक दिल्यानंतर जीव वाचवण्यासाठी तरुण कारच्या बोनेटवर चढला, यानंतर कार थांबवण्याऐवजी गाडी तशीच पळवली. हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यामध्ये कारच्या बोनेटवर तरुण लटकलेला दिसत आहे. बॉनेटवर लटकलेल्या व्यक्तीचा जीव वाचला आहे, पण जमिनीवर पडल्याने त्याला काही जखमा झाल्या आहेत. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव हरविंदर कोहली आहे.