लातूरवर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
By Admin | Updated: January 7, 2015 01:01 IST2015-01-07T00:07:22+5:302015-01-07T01:01:38+5:30
लातूर : आयुक्तालयासाठी हरकती नोंदविण्यासाठी केवळ अधिसूचना जारी झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांनी व्यवस्थीत हरकती नोंदवाव्यात शिवाय, लातूरवरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे मंगळवारी दिले असल्याची माहिती ॲड़ भारत साबदे यांनी दिली़

लातूरवर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
लातूर : आयुक्तालयासाठी हरकती नोंदविण्यासाठी केवळ अधिसूचना जारी झाली आहे़ त्यामुळे लातूरकरांनी व्यवस्थीत हरकती नोंदवाव्यात शिवाय, लातूरवरही अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला मुंबई येथे मंगळवारी दिले असल्याची माहिती ॲड़ भारत साबदे यांनी दिली़
लातूर येथेही आयुक्तालय स्थापन करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शैलेश लाहोटी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे शिष्टमंडळ सोमवारी मुंबईत दाखल झाले होते़ मुख्यमंत्री कार्यालयातून या शिष्टमंडळाला मंगळवारचा वेळ देण्यात आला होता़ त्यानुसार मंगळवारी शैलेश लाहोटी, ॲड़भारत साबदे, मोहन माने, आप्पा मुंडे, बाबुराव खंदाडे, अरीफ सिद्धीकी, अनिल पतंगे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली़ लातूर नांदेड पेक्षा लातूर गुणवत्तेच्या दृष्टीने सरस आहे़ लातूर शहरात २७ विभागीय कार्यालये असून आयुक्तालयासाठी १५ कोटींची वास्तूही बांधण्यात आली आहे़ त्यामुळे लातुरातच आयुक्तालय स्थापन करावे, अशी भूमिका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली़ यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्तालयासाठी केवळ हरकती मागविल्या आहेत़ त्यामुळे लातूरकरांनी व्यवस्थीत हरकती नोंदवाव्यात़ शासनाने अद्याप आयुक्तालयाचा निर्णय घेतलेला नाही़ शिवाय लातूरवरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले असल्याचे ॲड़ साबदे यांनी सांगितले़
आयुक्तालयासाठी सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे़ त्या आंदोलनात भारतीय जनता पार्टीही सहभागी होणार आहे़ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत़ त्यामुळे आयुक्तालय लातुरात झाले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली शिष्टमंडळाने केली असल्याचेही ॲड़ साबदे यांनी सांगितले़