खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 10:25 IST2025-10-27T10:12:49+5:302025-10-27T10:25:07+5:30
एका डिफेंडर कारने एकामागोमाग पाच वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

फोटो - आजतक
छत्तीसगडमधील बेमेतरामध्ये एका डिफेंडर कारने एकामागोमाग पाच वाहनांना जोरदार धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी कार मालकाच्या घराला वेढा घातला आणि तोडफोड केली. या गोंधळानंतर पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेतलं आणि पुढील तपास सुरू आहे.
डिफेंडरने ज्या पाच वाहनांना धडक दिली त्यात एक स्कूटी आणि पिकअपचाही समावेश होता. डिफेंडरने धडक दिल्यान पिकअपवर बसलेल्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सात जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे इतर दोघांचाही नंतर मृत्यू झाला.
हायस्पीड डिफेंडर कारमुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेकडो लोकांनी कार मालकाच्या घराची तोडफोड केली. आरोपी बंटी मालक सिंह नावाचा कापड व्यापारी आहे. शहरातील वाढता राग आणि तणाव पाहून बेमेटाराचे एसएसपी रामकृष्ण साहू घटनास्थळी पोहोचले आणि लोकांना शांत केलं. त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिलं.
बेमेतराचे एसएसपी रामकृष्ण साहू यांनी घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, कार नेमकी कोण चालवत होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. कारच्या मालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. घटनेच्या वेळी कार कोण चालवत होतं याबद्दलही लोकांकडून माहिती गोळा केली जात आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.