शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

JNU Attack : दीपिकाचे जेएनयू प्रेमानं सरकार चकित, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 11:39 PM

जेएनयूत झालेल्या हाणामारीनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

- एस. के. गुप्ता नवी दिल्लीः जेएनयूत झालेल्या हाणामारीनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची निदर्शनं अद्यापही सुरूच आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात दीपिका पादुकोण आणि कन्हैया कुमार यांनीसुद्धा सहभाग घेतला. दीपिका पादूकोण संध्याकाळी 7.45 वाजता जेएनयूमध्ये आली असता ती 10 मिनिटे विद्यार्थ्यांसोबत होती. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर ती निघून गेली. दुसरीकडे कन्हैय्या कुमारनं जेएनयू परिसरात जयभीमच्या घोषणा दिल्या आहेत. दीपिका पादुकोण आणि कन्हैया कुमार यांनी विद्यार्थ्यांच्या धरणे आंदोलनात सहभाग घेतल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने मंगळवारी संध्याकाळी जेएनयू कॅम्पसमध्ये जाऊन विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष आयशी घोष यांना शाबासकी दिल्याने सरकारही आश्चर्यचकित झाले. जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार यांच्या नेतृत्वात एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कन्हैया यांनी दीपिकासमोरच घोषणा दिल्या. दीपिका काळे कपडे परिधान करून कॅम्पसमध्ये आली होती. हा हिंसाचाराचा विरोध समजला जात आहे. मुंबईत अलीकडेच मोठ्या संख्येने फिल्मी स्टार आणि दिग्दर्शक जेएनयू हिंसाचाराच्या विरोधात झालेल्या निदर्शनात एकत्र आले होते. यामुळे सरकारही आश्चर्यचकित आहे.महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने सरकार स्थापन केले आहे. सरकार याचाही विचार करत आहे की, महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम तर चित्रपट उद्योगावर होत नाही ना? दीपिका पदुकोन दहा मिनिटे जेएनयू कॅम्पसमध्ये होती. सरकारच्या विरोधात ती काही बोलली नाही; पण ज्या प्रकारे तिने आयशी घोषला शाबासकी दिली ती कृती सरकारसाठी समस्या निर्माण करणारी आहे. हिंसाचारानंतर ज्या प्रकारे अभिनेत्री तापसी पन्नू, रिचा चडढा, दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह अनेक चित्रपट कलाकारांनी गेट वे आॅफ इंडिया परिसरात निदर्शने केली. दीपिकाच्या जेएनयू प्रेमाबाबत तर्क लावला जात आहे की, महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनानंतर तर हा परिणाम झाला नाही ना?दरम्यान, दीपिका जेएनयूतील आंदोलनात सहभागी झाल्यामुळे भाजपाने तिच्यावर टीका केली. भाजपाचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दीपिकाच्या छपाक या सिनेमावर बहिष्कार टाकण्यास सांगितलं आहे. बग्गा यांनी ट्विट करत तसं म्हटलं आहे.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा आयशी घोषसह 19 जणांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवलं असून, 4 जानेवारीला विद्यापीठातील सर्व्हर रूमची तोडफोड, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याच्या आरोपात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाजवळही 'फ्री काश्मीर' (काश्मीर स्वतंत्र करा) हे पोस्टर झळकावण्यात आले असून, महक मिर्झा प्रभू या मुलीवर गुन्हा नोंदवला. यासोबतच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांसह एकूण 31 आंदोलनकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. >निशंकला भेटणार कुलगुरूजेएनयूचे कुलगुरू प्रो. एम. जगदेश कुमार हे बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना भेटणार आहेत. असे सांगितले जात आहे की, जेएनयूत रविवारी झालेल्या हिंसाचारावर ते आपला अहवाल केंद्रीय मंत्र्यांना सोपविणार आहेत.

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणjnu attackजेएनयू