Deepika Padukone reveals how father locked himself after hearing Madhuri Dixit's marriage news | माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी बाथरुमममध्ये घेतलं होत कोंडून, दीपिकाचा खुलासा

माधुरी दीक्षितच्या लग्नाची बातमी ऐकल्यानंतर वडिलांनी बाथरुमममध्ये घेतलं होत कोंडून, दीपिकाचा खुलासा

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि माधुरी दीक्षित यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी अद्याप तरी मिळालेली नाही. मात्र इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत दोघी एकत्र पाहण्याचा योग आला. मुलाखतीदरम्यान दीपिकाने माजी बॅडमिंटन खेळाडू असणारे आपले वडिल प्रकाश पदुकोण यांच्याशी संबंधित काही आश्चर्यकारक माहिती उघड केली. दीपिकाने यावेळी खुलासा केला की, प्रकाश पदुकोण माधुरी दीक्षितचे खूप मोठे चाहते आहेत. जेव्हा माधुरी दीक्षितने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली, तेव्हा त्यांचं ह्रदय तुटलं होतं आणि त्यांनी स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं होतं. 

दीपिका पदुकोण सध्या आपल्या 'पद्मावत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, समीक्षकांकडूनही कौतुक केलं जात आहे. चित्रपटातील दीपिकाचा अभिनय पाहून बिग बी अमिताभ बच्चन यांनी पत्र पाठवून तिचं कौतुक केलं. स्वत: दीपिकाने फोटो शेअर करत ही माहिती दिली होती. 

नुकतंच दीपिका आणि माधुरी दीक्षित इंडिया टुडे मॅगजीनला मुलाखत देण्यासाठी एकत्र आल्या होत्या. मुलाखतीवेळी दीपिका आणि माधुरी दीक्षितने अनेक मजेशीर किस्से शेअर केले. दीपिकाने यावेळी सांगितलं की, 'प्रकाश पदुकोण माधुरी दीक्षितचे चाहते आहेत. जेव्हा माधुरी दीक्षितने आपल्या लग्नाची तारीख जाहीर केली, तेव्हा त्यांचं ह्रदय तुटलं होतं आणि त्यांनी स्वत:ला बाथरुममध्ये बंद करुन घेतलं'. दीपिकाचा हा खुलासा ऐकल्यानंतर माधुरी दीक्षितही आश्चर्यचकित झाली होती. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Deepika Padukone reveals how father locked himself after hearing Madhuri Dixit's marriage news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.