शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांच्या बचतीत घट; कोरोना लाटेमुळे परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 08:10 IST

नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात बचतीची गंगाजळी आटली असल्याचे आढळून आले.

हातात आलेल्या पैशांतून ठरावीक रकमेची बचत करणे, हा भारतीयांचा स्थायीभाव. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेत भारतीयांच्या बचतीला गळती लागल्याचा अहवाल नुकताच भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. त्यानुसार नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात बचतीची गंगाजळी आटली असल्याचे आढळून आले.

कशी झाली घट?

रोजगार आटल्याने बँकेतील जमापूँजीवर सर्व भिस्त आली. त्यामुळे बँकेतील ठेवींवर परिणाम झाला.  गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेतील ठेवींचे प्रमाण जीडीपीच्या ७.७ टक्के एवढे होते. ते तिसऱ्या तिमाहीत ३ टक्क्यांवर आले. पहिल्या तिमाहीत बँक ठेवी १.१३ लाख कोटींच्या होत्या. मात्र, दुसऱ्या तिमाहीत त्या ३.६२ लाख कोटींपर्यंत पोहोचल्या होत्या. तिसऱ्या तिमाहीत मात्र त्यात कमालीची घट झाली. 

कर्जाचे प्रमाण वाढले

जीडीपीच्या प्रमाणात घरगुती कर्जांचे प्रमाण ८० बेसिस पॉइंट्सने वाढले.लघुवित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याच्या प्रमाण घटले. परंतु बँकांकडून कर्ज घेणे वाढले. सप्टेंबर, २०२० ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण ३.२ टक्के होते परंतु डिसेंबरात संपलेल्या तिमाहीत तेच  ४ टक्क्यांपर्यंत वाढले.

घट का झाली?

कोरोनाकाळात देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अर्थचक्र मंदावले. अनेक उद्योगांनी मनुष्यबळात कपात किंवा उपलब्ध मनुष्यबळाच्या पगारात कपात करण्याचे सत्र आरंभले.त्यामुळे अनेकांचे एकतर रोजगार तरी बुडाले अथवा उत्पन्नात घट झाली.अस्थिरता निर्माण झाल्याने बचतही आटली.लोकांची क्रयशक्ती घटली तरी बचतीत नकारात्मकता आली.बचतीचे हे प्रमाण राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) ८.२ टक्के एवढे खाली आले.

बचतीच्या प्रमाणात किती घसरण झाली?

२०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत घरगुती बचतीच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली.पहिल्या तिमाहीत हे प्रमाण जीडीपीच्या २१.४ टक्के एवढे घसघशीत होते. आकड्यात सांगायचे झाल्यास पहिल्या तिमाहीत लोकांकडे  ८.१६ लाख कोटी  रुपयांची बचत होती.ती डिसेंबरच्या अखेरीस  निम्म्यावर म्हणजेच  ४.४४ लाख कोटी  वर आली.दुसऱ्या तिमाहीतही परिस्थिती बरी होती. बचतीचे प्रमाण या काळात जीडीपीच्या १०.२ टक्के एवढे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या