शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“जेव्हा गायीचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल” राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा – हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 19:33 IST

जावेदवर गोहत्या प्रतिबंध अधिनियम कलम ३,५ आणि ८ अंतर्गत कोर्टात गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने जावेदची याचिका फेटाळून लावली.

ठळक मुद्देसंपूर्ण जगात भारतच असा देश आहे ज्याठिकाणी विविध धर्माचे लोक राहतात. गायीचे रक्षण करणे हे कार्य केवळ एका धर्म पंथाचे नाही तर गाय ही भारतीय संस्कृती आहेजावेदला जामीन दिला तर मोठ्या प्रमाणात समाजात द्वेष निर्माण सामाजिक व्यवस्था ढासळू शकते

नवी दिल्ली – गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केले पाहिजे असं मत इलाहाबाद उच्च न्यायलयाने मांडले आहे. जावेद नावाच्या व्यक्तीला जामीन नाकारताना कोर्टाने ही टीप्पणी केली आहे. उत्तर प्रदेशातील गोहत्या बंदी अधिनियम कायद्यातंर्गत गुन्हा केल्याचा जावेदवर आरोप आहे. गाईला मूलभूत हक्क देण्यावरुन कोर्टाने महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

हायकोर्टाने म्हटलंय की, गायीला मुलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी सरकारने ससदेत विधेयक आणावं. गायीला नुकसान पोहचवणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी कडक कायदे करावेत असं मत कोर्टाने व्यक्त केले आहे. गायीचे रक्षण करणे हे कार्य केवळ एका धर्म पंथाचे नाही तर गाय ही भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती वाचवण्यासाठी कार्य देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने मग तो कुठल्याही धर्माचा असो त्याने केले पाहिजे.

तसेच जेव्हा गायीचे कल्याण होईल तेव्हा देशाचे कल्याण होईल असं कोर्टाने आदेशात म्हटलं आहे. जावेदने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे भाष्य केले आहे. जावेदवर गोहत्या प्रतिबंध अधिनियम कलम ३,५ आणि ८ अंतर्गत कोर्टात गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने जावेदची याचिका फेटाळून लावत सांगितले की, संपूर्ण जगात भारतच असा देश आहे ज्याठिकाणी विविध धर्माचे लोक राहतात. जे वेगवेगळी पूजा करतात परंतु देशासाठी प्रत्येकाचे विचार एकसमान आहेत.

अशावेळी जर प्रत्येक भारतीय देशाच्या एकतेसाठी आणि विश्वास समर्थन करण्यासाठी एक पाऊल पुढे येत असेल तर काही लोक ज्यांची श्रद्धा आणि विश्वास देशाच्या हितासाठी अजिबात नाही ते देशात अशाप्रकारे चर्चा घडवून देशाला कमकुवत करत असतात. गुन्ह्याचा आढावा घेतला तर प्रथमदर्शनी याचिकाकर्त्यांविरोधात गुन्हा सिद्ध होतो असं कोर्टाने म्हटलं आहे. जावेदला जामीन दिला तर मोठ्या प्रमाणात समाजात द्वेष निर्माण सामाजिक व्यवस्था ढासळू शकते असं मत कोर्टाने व्यक्त करत जावेदचा जामीन नाकारला आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcowगाय