दिल्ली- मारहाणीत मणिपूरमधील तरूणाचा मृत्यू
By Admin | Updated: July 21, 2014 10:26 IST2014-07-21T10:26:25+5:302014-07-21T10:26:41+5:30
बेदम मारहाणीमुळे मणिपूरमधील एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण दिल्ली येथे घडली आहे.

दिल्ली- मारहाणीत मणिपूरमधील तरूणाचा मृत्यू
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. २१ - बेदम मारहाणीमुळे मणिपूरमधील एका ३० वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण दिल्ली येथे घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा तरूण मित्राच्या घरून परत येत असताना दक्षिण दिल्लीतील कोटला मुबारकपूर भागात कारमधून आलेल्या पाच-सहा तरूणांनी त्याच्यावर हल्ला करत त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाला. त्याला तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. एखाद्या वादातून हे कृत्य घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.