शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएए’ आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 03:31 IST

शहराच्या एन्टेले भागात राहणाºया खातूनच्या मागे पती व नऊ मुले असा परिवार आहे.

कोलकाता : कोलकत्यातील ‘शाहीन बाग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पार्क सर्कस येथे सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) विरोधात गेला महिनाभर सुरू असलेल्या महिलांच्या ठिय्या आंदोलनात शनिवारी रात्री समिदा खातून नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला.

शहराच्या एन्टेले भागात राहणाºया खातूनच्या मागे पती व नऊ मुले असा परिवार आहे. तीव्र दम्याचा त्रास होत असूनही ही महिला नेटाने आंदोलनात सामील झाली होती व हृदयक्रिया बंद पडून तिचा मृत्यू झाला, असे आंदोलकांनी सांगितले. २५० महिलांचे हे आंदोलन ७ जानेवारीपासून सुरू आहे.

सांप्रदायिक तत्त्वांकडून वसाहतवाद नीतीचा अवलंब - पी. विजयन

सांप्रदायिक तत्त्वे आज सांप्रदायिकतेच्या आधारे जनतेत फूट पाडण्यासाठी ब्रिटिश वसाहतवाद नीतीचा वापर करीत आहेत. भारतीय स्वातंत्र्यांचा लढा वसाहतवादाविरुद्ध होता. आजची चळवळ वसातहवादाच्या समर्थकांविरुद्ध आहे, असे प्रतिपादन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केले.

‘मुंबई कलेक्टिव्ह’ कार्यक्रमात सांप्रदायिकतेविरुद्ध राष्ट्रीय लढा’ या विषयावर बोलताना त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून केंद्रावर जोरदार निशाणा साधला. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यामागची कारणे स्पष्ट केली.

फूट पाडण्याचा प्रयत्न

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले की, पूर्वीही वसाहतवाद्यांनी सांप्रदायिकतेचा वापर करून लोकांत फूट पाडली. आजही सांप्रदायिक तत्त्वे याच नीतीचा अवलंब करीत आहेत. पहिले म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा घटनात्मक मूल्यांविरुद्ध आहे. दुसरे, हा कायदा भेदभाव करणारा आणि मानवी हक्क डावलणारा आहे. तिसरे कारण म्हणजे हा कायदा संघ परिवाराच्या विचारसरणीचा असून हिंदू राष्ट्र लादण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. या कायद्याविरुद्ध आमचा संघर्ष जारी राहील.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकDeathमृत्यूIndiaभारतPoliceपोलिसMamata Banerjeeममता बॅनर्जी