दुचाकीवरुन पडल्याने जळगावच्या महिलेचा मृत्यू

By admin | Published: February 15, 2016 12:37 AM2016-02-15T00:37:09+5:302016-02-15T00:37:09+5:30

फोटो

Death of a woman from Jalgaon falls on | दुचाकीवरुन पडल्याने जळगावच्या महिलेचा मृत्यू

दुचाकीवरुन पडल्याने जळगावच्या महिलेचा मृत्यू

Next
टो
जळगाव: अपघात झालेल्या मामेभावाला पाहण्यासाठी जात असताना पहूर (ता.जामनेर) गावात दुचाकीवरुन पडल्याने सुनिता भगवान बारी (वय ४० रा.अर्जुन नगर, हरिविठ्ठल नगर) यांचा रविवारी दुपारी साडे तीन वाजता जळगावला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
सुनिता बारी यांचे पहूर हे माहेर आहे. तर बुलडाणा येथे त्यांच्या मामे भावाचा अपघात झाला होता,त्यांना पाहण्यासाठी त्या पती भगवान त्र्यंबक बारी यांच्यासोबत रविवारी सकाळी जळगावहून पहूरला गेल्या. तेथे थोडा वेळ थांबून दोघं पती-पत्नी बुलडाणा येथे जाण्यासाठी निघाले असता घरापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर दुचाकीवरुन त्या अचानक खाली कोसळल्या. त्यात त्यांच्या नाकाला व छातीला मार लागला. नाकातोंडातून रक्त यायला लागल्याने त्यांचे भाऊ व अन्य लोकांनी त्यांना तातडीने पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर रुग्णवाहिकेतून जळगावला आणण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दुपारी अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी हरिविठ्ठल नगरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पती ला.ना.विद्यालयात नोकरीला
पती भगवान बारी हे ला.ना.सार्वजनिक विद्यालयात नोकरीला आहेत तर वडील ए.आर.खांजोडकर पहूर येथील लेले विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आहेत. मुलगा चैतन्य हा पाचवीला तर मुलगी दीपिका ही बारावीला शिक्षण घेत आहे.

Web Title: Death of a woman from Jalgaon falls on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.