शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

बिहारमध्ये 'एईएस' आजाराचा कहर सुरुच; आत्तापर्यंत 96 मुलांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 10:38 IST

यावर्षीच्या जानेवारीपासून या आजारामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल हॉस्पिटलमध्ये 17 मुलांचा मृत्यू एईएसमुळे झाला आहे. सध्या 115 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पटणा - बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराचं कहर वाढलेला आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 96 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 20 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची मुजफ्फपूरमधील श्रीकृष्णा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाची पाहणी केली. हर्षवर्धन यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी चौबे आणि बिहारमधीलआरोग्यमंत्री मंगल पांडेयदेखील उपस्थित होते. या पाहणीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्यातील आणि जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांनी योग्य त्या खबरदारी घेण्याचे आदेश दिले. सूत्रांच्या माहितीनुसार ज्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री रुग्णालयात पाहणी करत होते. त्या 4 तासाच्या वेळेत 3 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे मंत्री आणि आरोग्य अधिकारी तेदेखील चिंतेत पडले. 

अद्यापही 115 मुलांवर उपचार सुरु पाहणीदरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मुलांच्या नातेवाईकांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहे. सरकार कोणताही हलगर्जीपणा करत नाही. योग्य ती पावलं सरकार उचलत आहे. मुजफ्फपूरमध्ये रुग्णालय अधिक्षक एसपी सिंह यांनी सांगितले की, यावर्षीच्या जानेवारीपासून या आजारामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर केजरीवाल हॉस्पिटलमध्ये 17 मुलांचा मृत्यू एईएसमुळे झाला आहे. सध्या 115 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच या आजारापासून मुलांचा बचाव करण्यासाठी डॉक्टरांची आणखी टीम पटणावरुन मुजफ्फरपूरला पाठविण्यात आली आहे अशी माहिती दिली. 

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये दरवर्षी या आजारामुळे मुलांचा मृत्यू होतो. या आजाराचा सामना करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी अमेरिकेपासून जपानपर्यंत अनेक देशांचे दौरे केले मात्र काहीच साध्य झालं नाही. यावर्षीही मुलांचा मृत्यू शंभराच्या आसपास पोहचला आहे. तर आरोग्य विभाग उपचाराऐवजी देवावर विश्वास ठेवा सांगत लवकर पाऊस पडो आणि या आजाराचा प्रकोप थांबावा अशी इच्छा व्यक्त करत आहे. वाढत्या उष्माघाताने मुजफ्फरपूरमधील परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. या आजाराचा प्रकोप थांबण्यासाठी सरकारकडून 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मुलांच्या लसीकरणावर खर्च करते तरीही मुलांचे मृत्यू थांबत नाहीत. 

टॅग्स :BiharबिहारHealthआरोग्य