शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

आसाममध्ये विषारी दारूमुळे 127 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 12:36 IST

आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहेत. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख तर आजारी पडलेल्या नागरिकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

गुवाहाटी - आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने 127 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी (21 फेब्रुवारी) दारू प्यायल्यानंतर काही जण आजारी पडले होते. दारू प्यायल्याने अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने गोलाघाट येथील शहीद कुशल कंवर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारू प्यायल्याने अनेकांची अचानक तब्येत बिघडली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच दारूचे नमूने घेतले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. विषारी दारू ही शहराच्या बाहेरून आणली होती. ही दारू उत्पादन शुल्काच्याच काही कर्मचार्‍यांनी आणल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाने याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

आसामच्या गोलाघाट आणि जोरहाटमध्ये चहाच्या बागांमधील काही लोक विषारी दारू प्यायले होते. तब्बल 340 जणांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक कुलधर सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलाघाटमध्ये या प्रकरणी 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तसेच पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये

आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी जोरहाटच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयातमध्ये जाऊन उपचार घेत असलेल्या नागरिकांची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांनी प्रत्येकी दोन लाख तर आजारी पडलेल्या नागरिकांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सोनोवाल यांनी सांगितले की, विषारी दारू प्रकरणातील दोषींना सोडणार नाही. तर, विरोधी पक्ष काँग्रेसने असा आरोप केला आहे की, अवैध दारुची विक्री रोखण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पावले उचलली नाहीत. राज्याच्या अबकारी खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणीही पक्षाने केली आहे.

विषारी दारूमुळे उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये 92 जणांचा मृत्यूउत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने याआधी तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला होता. सहारनपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 46 जणांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्यातील 36 जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते. विषारी दारूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सहारनपूरच्या 18 लोकांचा उपचारादरम्यान मेरठमध्ये मृत्यू झाला होता. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करू असे प्रशासनाने सांगितले आहे. याप्रकरणी विविध ठिकाणी छापे मारुन आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून बेकायदा दारू मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली होती. 

टॅग्स :AssamआसामDeathमृत्यूPoliceपोलिस