ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:32 IST2025-08-14T18:32:36+5:302025-08-14T18:32:55+5:30

Kishtwar Cloudburst Update: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे आज मचैल माता मंदिराजवळ ढगफुटी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या ढगफुटीनंतर या परिसरात मृत्यूनं तांडव घातलं असून, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Death toll in Kishtwar after cloudburst, 33 dead so far, more than 120 injured, 200 missing | ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता

ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता

जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे आज मचैल माता मंदिराजवळ ढगफुटी होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या ढगफुटीनंतर या परिसरात मृत्यूनं तांडव घातलं असून, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० हून अझिक जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं आहे. याशिवाय १२० हून अधिक जण जखमी झाले आहेत. तर २०० हून अधिक जखमी झाले आहेत.

ढगफुटीची ही घटना चिशोती गावामध्ये चंडीच्या मंदिरात सुरू असलेल्या यात्रेदरम्यान घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, या दुर्घटनेत  आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सीआयएसएफच्या दोन जवानांचाही समावेश आहे. याबरोबरच १२० जण जखमी झाले आहेत. दुर्घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी चिशोती येथे झालेल्या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असण्याची भीती वर्तवली आहे. दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्वरित सक्रिय होत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. दरम्यान, घटनास्थळावरून  समोर येत असलेले फोटो आणि व्हिडीओमधून येथील यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी नेले जात असल्याचे दिसत आहे. मचैल माता यात्रेच्या सुरुवातीला चिशोती हे ठिकाण लागते. तिथेच ही दुर्घटना घडली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे झालेल्या ढगफुटीच्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच किश्तवाड येथील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून अससल्याचंही त्यांनी सांगितलं. गरजूंना शक्यतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.  

Web Title: Death toll in Kishtwar after cloudburst, 33 dead so far, more than 120 injured, 200 missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.