शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

सनातनला विरोध करणाऱ्यांना मृत्युदंड अन्...! धीरेंद्र शास्त्री यांच्या हिंदू राष्ट्राच्या प्लॅमध्ये काय-काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 17:57 IST

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल.

बागेश्वर धाम पीठाधीश्वर आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे हिंदू राष्ट्राच्या मोहिमेसंदर्भात सातत्याने बोलत असतात. त्यांचा दरबार जेथे जेथे लागतो तेथे-तेथे ते हिंदू राष्ट्रासंदर्भात आपले विचार व्यक्त करतात. गेल्या तीन दिवसांपासून ते उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हनुमान कथेचे वाचन करत आहेत. दरम्यान त्यांनी, जेव्हा देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हा काय होईल? यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, भारत हिंदू राष्ट्र झाल्यानंतर, सनातन धर्माविरोधात बोलणे हे अत्यंत निंदनीय कृत्य असेल. दंड प्रक्रिया बदलेल आणि फाशीची शिक्षा होईल. प्रत्येकाला हिंदू राष्ट्रात राहण्याचा अधिकार असेल, मात्र ज्याप्रमाणे मुस्लीम देशांमध्ये मुस्लीम धर्माच्या अनुयायांना प्राधान्य दिले जाते, त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रात सनातन समाजाला प्राधान्य असेल. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा असेल.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "देश संविधान, हनुमान आणि सनातन यांच्या माध्यमाने चालवला जाईल. केवळ सनातन धर्मच आपल्याला तिसऱ्या महायुद्धापासून वाचवू शकतो. देशाचे विभाजन करू इच्छिणाऱ्यांपासून आपण सावध रहायला हवे. गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळेल. हिंदू राष्ट्रात जातीभेदावर राजकारण होणार नाही. हिंदू राष्ट्र झाल्यानंतर कोणीही हिंदूंकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. 

धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले, दुबई आणि यूएईमध्ये ज्या पद्धतीने कायदे आहेत, तेथे मुस्लीम धर्माला प्राधान्य दिले जाते. त्याच पद्धतीने, हिंदू राष्ट्रात सर्व धर्माच्या लोकांना त्यांच्या धर्माचे आणि संस्कृतीचे पालन करण्याचा अधिकार असेल. पण, प्राधान्य सनातनींनाच असेल. यावेळी त्यांनी, हिंदू राष्ट्रासाठी दिल्ली ते वृंदावन, अशी पदयात्रा काढण्याची घोषणाही केली.

हिंदूंना जागृत करण्यासाठी आपण दिल्ली ते वृंदावन, अशी दुसरी यात्रा काढू. सरकार घोषणा देते, 'बच्चे दो अच्छे' मग 'चच्ची के 30 बच्चे क्यों?' असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. एवढेच नाही तर, हिंदूंच्या मुलांची क्वांटिटी कमी असली तरी, ते त्यांची क्वालिटी चांगली असावी. मुले चारच असावीत पण कट्टर हिंदू असावीत. मानवांत मानवता यावी, यासाठी क्रांती घडवू, असेही धीरेंद्र शासंत्री म्हणाले.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामHindutvaहिंदुत्वHinduहिंदूHinduismहिंदुइझम