शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

डॉक्टरचा आॅनड्युटी खून, १ कोटी ९९ लाख भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 11:48 PM

वैद्यकसेवेतील व्यक्ती व संस्थांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे उत्तराखंड उच्च न्यायालयाने आदेश देताना म्हटले

- खुशालचंद बाहेती मुंबई : आॅनड्युटी असताना गोळ्या झाडून खून झालेल्या डॉक्टरच्या पत्नीला १ कोटी ९९ लक्ष ९ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच विशेष पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन द्यावी, असा आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिला आहे. कर्तव्यावर असताना फक्त पोलिसांचाच मृत्यू होऊ शकतो असे नाही, तर वैद्यक क्षेत्रातील लोकांनाही हा धोका असतोच, असे नमूद करून सर्व वैद्यकसेवेतील व्यक्ती व संस्थांचे संरक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असेही न्यायालयाने बजावले.२० एप्रिल २०१६ रोजी शासकीय आरोग्य केंद्र, जसपूर येथे पेशंट तपासत असताना बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील कुमार यांचा २ जणांनी गोळ्या झाडून खून केला. यानंतर उत्तराखंड राज्यात मोठी खळबळ उडाली. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपये देण्याचे मान्य केले. मात्र, फक्त १ लाख रुपयेच दिले, तसेच अनुकंपातत्त्वावर कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देण्याचेही मान्य केले. मात्र, मुलाला कंत्राटी प्राध्यापक म्हणून नेमले.डॉ. सुनील कुमार यांच्या पत्नीने उत्तराखंडच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नुकसानभरपाई, कायम नोकरी, ५ वर्षे शासकीय निवासस्थान आणि विशेष पेन्शन मिळण्यासाठी अर्ज केला. यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. मात्र, प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.उच्च न्यायालयात सरकारने मान्य केल्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. मात्र, नागरीसेवा (विशेष पेन्शन) नियमाप्रमाणे फक्त ज्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागते त्यांनाच विशेष पेन्शन देता येते, असा मुद्दा मांडला. हा मुद्दा अमान्य करीत न्यायालयाने या योजनेचा उद्देश हा हिंसाचाराला आॅनड्यूटी बळी पडणाऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा असून, शासनाने उदारमतवादी असले पाहिजे, असे सांगितले. खून करणाºयांच्या नातेवाईकाच्या मृत्यूशी या डॉक्टरचा कोणताही संबंध नव्हता, तरी त्यांना प्राण गमवावा लागला. फक्त पोलीसच नव्हे, तर डॉक्टरही जिवाला धोका पत्करून सेवा देतात, असे नमूद करून १ कोटी ९९ लक्ष ९ हजार भरपाई ७ टक्के व्याजासह द्यावी व विशेष पेन्शन योजनेचे फायदे ८.५ टक्के व्याजासह द्यावेत, असे आदेश दिले. न्या. राजीव शर्मा व मनोज कुमार तिवारी यांच्या खंडपीठाने वैद्यकीय सेवा हिंसाचार व मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचे आदेश दिले.जोखीम पत्करून कर्तव्य बजावतात...आयएमएच्या अभ्यासाप्रमाणे ७५ टक्के डॉक्टरांचा कर्तव्य करीत कोणत्या ना कोणत्या शारीरिक हिंसाचाराचा सामना.ब्युरो आॅफ लेबर स्टॅटिस्टिक्स (यूएसए)प्रमाणे २१ टक्के परिचारिकांवर हल्ले. ५० टक्क्यांपेक्षा जास्त परिचारिकांना शिवीगाळ.इमर्जन्सी विभागात १२ टक्के परिचारिकांवर हल्ले,तर ५९ टक्के परिचारकांना शिवीगाळ.पोलिसांप्रमाणे वैद्यक क्षेत्रातील लोकांचीही जिवाचा धोका पत्करून सेवा.वैद्यक सेवेतील लोकांचे संरक्षण हे सरकारचे कर्तव्यच.पेन्शन योजनेसाठी मृत कर्मचाºयांच्या बाबतीत शासनाचे धोरण उदारमतवादी असावे.

टॅग्स :MurderखूनHigh Courtउच्च न्यायालयdoctorडॉक्टर