रेल्वे वीजतारांच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:37+5:302015-12-13T00:07:37+5:30
नाशिक : मालगाडीच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बारा वर्षीय मुलाला रेल्वेच्या वीजतारांचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१२) पहाटेच्या सुमारास घडली़ मयत मुलाचे नाव अर्जुन विंधाराम मह (१२, रा. ठाकुर्ली, कल्याण) असे असून तो कचरा गोळा करण्याचे काम करीत असल्याचे समजते़ शुक्रवारी (दि़११) दुपारच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्थानकात प्लॅटफार्मच्या बाजूला उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यावर चढत असताना अर्जुनला वीजतारांचा धक्का बसला़ त्यामध्ये तो डब्यावरून फेकला जाऊन खाली पडला व बेशुद्ध झाला़ त्यास उपचारासाठी प्रथम इगतपुरी ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले़ (प्रतिनिधी)

रेल्वे वीजतारांच्या धक्क्याने मुलाचा मृत्यू
न शिक : मालगाडीच्या डब्यावर चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बारा वर्षीय मुलाला रेल्वेच्या वीजतारांचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़१२) पहाटेच्या सुमारास घडली़ मयत मुलाचे नाव अर्जुन विंधाराम मह (१२, रा. ठाकुर्ली, कल्याण) असे असून तो कचरा गोळा करण्याचे काम करीत असल्याचे समजते़ शुक्रवारी (दि़११) दुपारच्या सुमारास इगतपुरी रेल्वे स्थानकात प्लॅटफार्मच्या बाजूला उभ्या असलेल्या मालगाडीच्या डब्यावर चढत असताना अर्जुनला वीजतारांचा धक्का बसला़ त्यामध्ये तो डब्यावरून फेकला जाऊन खाली पडला व बेशुद्ध झाला़ त्यास उपचारासाठी प्रथम इगतपुरी ग्रामीण रुग्णालय व नंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले़ (प्रतिनिधी)