शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
3
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
4
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
5
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
6
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
8
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
9
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
10
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
11
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
12
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
13
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
14
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
15
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
16
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
17
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
18
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
19
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
20
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 14:08 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढमार्च महिन्याच्या पगारापासून कर्मचाऱ्यांना मिळणार डीएभारतात 1972 मध्ये मुंबईतील कपडा उद्योगात सर्वप्रथम महागाई भत्त्या देण्यास झाली होती सुरुवात

मुंबई - केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. देशासमोर उद्भवलेल्या करोनाच्या संकटावर मात करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. 

महागाई भत्ता म्हणजे काय -सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी महागाई भत्ता (डीए) दिला जातो. जगात केवळ भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्ता वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. 

मार्च महिन्याच्या पगारापासून मिळणार डीए -यापूर्वीच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी राज्यसभेमध्ये लेखी उत्तरात मार्च महिन्याच्या पगारापासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता मिळायला सुरुवात होईल, असे स्पष्ट केले होते.

भारतात 1972 मध्ये मुंबईतील कपडा उद्योगात सर्वप्रथम महागाई भत्त्याची सुरुवात झाली. यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यायला सुरुवात केली होती. वाढत्या महागाईचा ताण सरकारी कर्मचाऱ्यांवर पडून नये हा यामगचा उद्देश होता. ऑल इंडिया सर्व्हिस अॅक्ट 1951 अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देता यावा यासाठी 1972 मध्येच हा कायदा तयार करण्यात आला होता.  

टॅग्स :PM Narendra Modi Cabinetनरेंद्र मोदी मंत्रिमंडळCentral Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत