प्राप्तिकर भरण्याची मुदत पुन्हा वाढवली; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:45 IST2018-08-28T20:44:36+5:302018-08-28T20:45:04+5:30

प्राप्तिकर भरण्याची मुदत पुन्हा वाढवली; पण...
नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांचा प्रतिसाद पाहून प्राप्तिकर भरण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढविली होती. मात्र, महापुरामुळे केवळ केरळवासियांसाठीच सरकराने पुन्हा मुदत वाढविली असून ती आता 15 सप्टेंबरपर्यंत केली आहे.
केरळमध्ये ऑगस्टमध्ये महापुराने हाहाकार माजवला आहे. यामुळे तेथील नागरिक प्राप्तिकर 31 ऑगस्टपर्यंत भरू शकणार नाहीत. यामुळे केंद्र सरकारने केरळवासियांना दिलासा दिला आहे. सीबीडीटीने ही घोषणा केली आहे.
जीएसटी काऊन्सिलनेही या आधी जीएसटी भरण्याची मुदत वाढविली होती.