शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

Aligarh Child Murder : आरोपींना फाशी द्या, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 10:06 IST

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे. 

ठळक मुद्दे उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे.आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे. 

अलीगड - उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दाम्पत्याने 10 हजार रुपयांचे कर्ज थकवल्याने त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरातून संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीलं आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे. 

'अलीगड प्रकरणातील आरोपींना दोन महिन्यांच्या आतमध्ये शिक्षा सुनावली जावी. जेणेकरून देशात एक मार्मिक संदेश पोहचेल. अपराध संशोधन कायदा 2018 ची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी' अशी मागणी दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दल तैनात करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ट्विंकल असं या चिमुकलीचं नाव आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली असून तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

Aligarh Child Murder : आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय द्या तसेच आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी 'अलीगडमध्ये घडलेली घटना ही अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे मी विचलित झालो आहे. एखाद्या लहान मुलीची अशाप्रकारे क्रौर्याने हत्या करायला माणसांचे हात कसे काय तयार होतात? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या प्रकरणी न्याय झालाच पाहिजे' असं ट्वीट केलं आहे. तसेच 'अलीगडमध्ये जी घटना घडली ती अमानवी आणि क्रौर्याचा कळस गाठणारी घटना आहे. त्या मुलीच्या आई वडिलांना आता काय वाटत असेल याचा विचार करायलाही भीती वाटते. जे अपराधी आहेत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या अलीगडमध्ये टप्पल परिसरात एक दाम्पत्य राहते. त्यांची अडीच वर्षाची मुलगी ट्विंकल ही चार दिवसांपासून घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर गावाबाहेरील कचराकुंडीजवळ तिचा मृतदेह सापडला होता. हत्या करणाऱ्यांनी मुलीचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच मृतदेह कचराकुंडीत फेकल्याने भटके कुत्रे तिच्या मृतदेहाजवळ असलेले काही ग्रामस्थांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी लगेचच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली. 

मुलीच्या मृतदेह सापडल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. मुलीवर बलात्कार झाला नव्हता, मात्र तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून चार जणांना अटक केली तसेच तपासात दिरंगाई केल्यामुळे पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. 

पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी कर्जासाठी अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केल्याचं सांगितलं. आरोपींचा मुलीच्या आई-वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. दाम्पत्याने त्यांच्याकडून दहा हजारांचे कर्ज घेतले होते. मात्र त्या कर्जाची त्यांनी परतफेड केली नसल्याने वाद झाला होता. त्यातूनच आरोपींनी दाम्पत्याला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिली होती. मुलीच्या वडिलांनी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशMurderखूनPoliceपोलिसdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदी