ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 06:35 AM2018-06-17T06:35:37+5:302018-06-17T06:35:37+5:30

रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे.

On the day of Eid, Kashmir gets disturbed, stone pelting on security forces | ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक

ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक

Next

श्रीनगर : रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे. ईदचा नमाज अदा करून झाल्यानंतर, राजधानी श्रीनगरसह अनंतनाग, तसेच अनेक शहरांमध्ये जमावाने दगडफेक सुरू केली. त्यात सुरक्षा दलाचे जवान गंभीर जखमी झाले आहेत.
शिवाय श्रीनगर व अन्य शहरांत जमावाकडून इसिसचे झेंडे फडकावण्यात आले. तरुणांनी चेहºयांना रुमाल बांधले होते, पण त्यात लहान मुलांनाही सहभागी करून घेतले होते. या वेळी प्रथमच इतकी लहान मुले यात सहभागी झाली होती. श्रीनगर शहराबाहेर सीआरपीएफच्या पथकावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात दिनेश पासवान हा जवान गंभीर जखमी झाला असून, त्याला लष्कराच्या बदामी बागच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
>नौशेरा, अरनियात
पाकचा गोळीबार
नौशेरा सेक्टरमध्ये
नियंत्रण रेषेजवळ पाकच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. अरनिया सेक्टरमध्येही पहाटे
४ वाजता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिले.
>यंदा वाघा बॉर्डरवर मिठाई वाटप नाही
अमृतसर : भारत व पाक यांच्यातील अतिशय तणावाच्या संबंधांमुळे ईदचा दिवस असूनही पंजाबच्या वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांच्या जवानांनी एकमेकांना मिठाई दिली नाही. दरवर्षी दोन्ही देशाचे सैनिक मिठाई वाटून ईद साजरी करीत असतात.
>अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईदनिमित्त नमाज अदा केल्यानंतर,
काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक केली. दगडफेक करणाºयांच्या हातात पाकिस्तान व इसिसचे झेंडे होते.
हा जमाव पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता.
दगडफेक सुरू झाल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक सुरूच राहिल्याने जवानांनी हवेत गोळीबार केला. तिथे त्या वेळी ग्रेनेड फेकला गेला. त्यात एक तरुण ठार झाला. तेव्हापासून दिवसभर अनंतनागमध्ये तणाव होता. श्रीनगरमध्येही नमाज अदा केल्यानंतर जमावाने जोरदार दगडफेक केला.
>जवानाच्या वडिलांचा इशारा
माझ्या मुलाच्या मारेकºयांना ७२ तासांत ठार करा अन्यथा
आपण स्वत:च मुलाच्या हत्येचा सूड घेऊ , असे शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी सुरक्षा दले व पोलिसांना सांगितले
आहे. औरंगजेबचे वडील म्हणाले की, माझ्या मुलाला मारणाºया दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला सरकारला कोणी थांबविले आहे की काय? तीन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी स्वत:च बदला घेईन.
औरंगजेब यांचे वडील व काकाही सैन्यात होते. औरंगजेब यांच्या काकाला वीरमरण आले होते. औरंगजेब यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर काही राजकीय नेत्यांनी जे राजकारण सुरू केले आहे, त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: On the day of Eid, Kashmir gets disturbed, stone pelting on security forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.