शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील रस्ते ठरताहेत पादचाऱ्यांसाठी मृत्युमार्ग, दररोज 56 जणांचा जातो बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:05 IST

भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतात रस्ता ओलांडताना होणाऱ्या अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात दररोज 56 पादचाऱ्यांचा रस्ता ओलांडताना मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारत सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 2014 साली रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 12 हजार 330 होती. 2017 साली हा आकडा वाढून 20 हजार 457 पर्यंत पोहोचला आहे. याची सरासरी काढल्याच दररोज रस्ता ओलांडताना 56 जणांचा मृत्यू होत असल्याचे समोर येते.  भारतात पादचारी हे रस्ता ओलांडत असताना सर्वाधिक असुरक्षित असतात. दुचाकी आणि सायकलस्वारांचाही याच श्रेणीत समावेश होते. अधिकृत आकडेवारीनुसार 2017 मध्ये रस्ते अपघातात दररोज 133 दुचाकीस्वार आणि 10 सायकलस्वार मृत्युमुखी पडले.  राज्यवार आकडेवारी पाहिल्यास गतवर्षी रस्ते अपघातामध्ये पादचाऱ्यांचे सर्वाधिक मृत्यू तामिळनाडूमध्ये झाले. तामिळनाडूमध्ये गतवर्षी रस्ते अपघातात 3 हजार 507 जण मृत्युमुखी पडले. त्याखालोखाल महाराष्ट्रामध्ये 1831 जणांचा मृत्यू झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये  1331 पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना प्राण गमवावे लागले होते. त्याबरोबरच रस्ते अपघातातील दुचाकीस्वारांच्या मृत्युमध्येही तामिळानाडू पहिल्या स्थानावर आहे. तामिळनाडूमध्ये गतवर्षी झालेल्या रस्ते अपघातात सहा हजार 329 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशमध्ये पाच हजार 699 आणि महाराष्ट्रात चार हजार 569 दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.  

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्याIndiaभारत