शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Dawood: डॉनचा पत्ता सांगा, लाखो जिंका, ‘एनआयए’ने जाहीर केले २५ लाखांचे बक्षीस; इतरही रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 03:57 IST

Dawood Ibrahim: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बक्षिसे जाहीर केली आहेत.

मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यानुसार दाऊदचा पत्ता सांगणाऱ्यास २५ लाख रुपये, तर त्याचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास २० लाख रुपये इनाम जाहीर केले आहे. ‘डी गँग’मधील इतरही हस्तकांवर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

दाऊद टोळीच्या कारवायांना उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएने दाऊद टोळीशी संबंधित खंडणी वसुली, सेटलमेंट, ड्रग्ज तस्करी आणि हवाला रॅकेट यांतील आर्थिक व्यवहार आणि सिंडिकेटबाबत चौकशी करून  गुन्हा दाखल केला आहे.  एनआयएच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. त्या अनुषंगाने तपास करीत एनआयएने सलीम फ्रुटला अटक केली.

सलीमने बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी आणि जागेचा मालकी हक्क मिळविण्यासाठी दाऊद टोळीतील छोटा शकीलच्या नावाचा वापर केल्याचा संशय आहे. एनआयएच्या तपासात सलीमने किमान दोन मालमत्तांबाबत दाऊद टोळीकडून धमकावल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांना धमकावून कोट्यवधींची खंडणी छोटा शकील व दाऊदपर्यंत पोहोचल्याचा एनआयएला संशय आहे.  

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिमNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारी