शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदची संपत्ती १२ लाख कोटींची! सध्या काय करतो, पैसा कुठून आणतो? सगळी कुंडलीच समजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 05:52 IST

अंडरवर्ल्डचा डॉन आणि मुंबईसह भारतातील अनेक गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड असलेल्या दाऊदची संपत्ती पोहोचली आहे, तब्बल १२ लाख कोटींवर.

आशिष सिंह, विशेष प्रतिनिधीअंडरवर्ल्डचा डॉन आणि मुंबईसह भारतातील अनेक गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड असलेल्या दाऊदची संपत्ती पोहोचली आहे, तब्बल १२ लाख कोटींवर. ड्रग्जचा धंदा, अनेक वस्तूंची चोरटी वाहतूक, खंडणी - धमकी, हवाला रॅकेट, बेनामी संपत्ती अशा मिळेल त्या गैरमार्गाने दाऊदने हा पैसा जमवला आहे. त्याच्या या अफाट, अतिप्रचंड संपत्तीचा वारस आहे, त्याचा मुलगा मोईन नवाज. तोच नव्हे, तर दाऊदच्या भावंडांची मुले, छोटा शकीलचा मुलगा, इकबाल कासकरचा मुलगा अशी या गुंडांची पुढची पिढी आता या काळ्या जगाचे अनभिषिक्त सम्राट बनण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाने पैसा कमावत आहेत.

मुंबईतील बॉम्बस्फोट, खंडणीचे गुन्हे, मु धमक्यांची प्रकरणे, हत्या, हवाला रैकेट, ड्रग्ज, बॉलीवुड टॉलीवूडमधील बेकायदा गुंतवणूक यासारख्या अनेक इब्राहीम भारत सरकारला हवा असला, तरी गेल्या काही वर्षांत अशा प्रकरणांत थेट भाग न घेता हस्तकांमार्फत तो ही कामे करून घेत असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उघड केले आहे.

डी कंपनीच्या या अंडरवर्ल्ड जाळ्याची, त्यातील बेकायदा कामांचीही विभागणी झाली आहे. दाऊदने जमा केलेली ही अफाट संपत्ती गेल्या काही वर्षांतकंटेनर कंपन्या, शिपिंग कंपन्या, आयात-निर्यात, खाण, विमान उद्योग, ऊर्जा, मिनरल कंपन्या, पब्लिकेशन हाऊस, रियल इस्टेट, कंत्राटी शेती, हिरे व्यापार, सोन्याचा पुरवठादार आदी क्षेत्रात गुंतवण्यात आली आहे. यातील अनेक धंदे कायदेशीर असतील आणि त्यातून मिळणारा पैसाही बेकायदा नसेल, याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.पाकिस्तानातील गुंतवणूकदारभारतविरोधी कारवायांसाठी सातत्याने पाकिस्तानच्या लष्करातील आयएसआयमधील अनेकांना साह्य केलेला दाऊद कराचीत संरक्षण खात्याच्या ताब्यातील जागेत राहात असला, तरी मोस्ट वॉण्टेड आरोपी म्हणून लपूनछपून नव्हे, तर उजळ माथ्याने.बड़ा गुंतवणूकदार म्हणून त्याची तेथे बडदास्त ठेवली जाते. आयएसआयचा तो अॅसेट आहे. त्यांना अनेक कारवायांत मार्गदर्शन करणे, त्यासाठी मदत पुरवणे यासह त्यांच्या अधिकाऱ्यांचा बेकायदा पैसा गुंतवणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल सल्ले देण्यापर्यंत अनेक बाबतीत दाऊदचा शब्द अंतिम असतो.ड्रग्जचा धंदा सोडल्याची अफवादाऊदने हज यात्रा केल्यानंतर ड्रग्जच्या धंद्यातून अंग काढून घेतल्याचे जाणीवपूर्वक पसरवण्यात आले होते, मात्र अमेरिका आणि भारतात आजही दाऊदच्या हस्तकांमार्फत मोठ्या प्रमाणात इग्जचा काळाबाजार होतो, असे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

दाऊदला सध्या धो धो पैसा मिळवून देणारा धंदा म्हणजे आफ्रिकेतील कॉन्फ्लिक्ट डायमंड किंवा ब्लड डायमंडचा धंदा. आंतरराष्ट्रीय बाजारात या हिन्याची बोलीच कोटीच्या घरात असते. दाऊदचा हा धंदा, त्याची यातील गुंतवणूक अनीस इब्राहीम, त्याचा मुलगा आरिस इब्राहीम सांभाळतात. तेथील अनेक टोळ्या खाणीतून मिळणाचा या हियांवर डल्ला मारतात, ते पळवतात किंवा कधी स्वतःच पळवून आणलेल्या गुलामांच्या मदतीने हिरे शोधतात.

त्यात होणारा रक्तपात केजीएफ चित्रपटाप्रमाणे असल्याने या हिन्यांना ब्लड डायमंड म्हटले जाते. अंगोला, सिएरा लिओन, काँगोसारख्या देशांतून स्वस्तात हिरे खरेदी करून ते दाऊद टोळी आंतरराष्ट्रीय पातळीवर काळ्या बाजारात अब्जावधींना विकते. पोलंड आणि अन्य युरोपीय देशांत हा व्यवहार चालतो.

औषध तस्करीतून पैसा डी कंपनीने औषधांच्या बेकायदा व्यापारात हात घातला असून, खाडी देशांत व्हायग्राचा बेकायदा पुरवठा सुरु केला आहे. शिवाय भारतात कॅन्सरसह इतर महागड्या औषधांच्या बेकायदा पुरवठ्यातूनही ते पैसा कमवत आहेत, असे गुप्तचर सांगतात.कोणाकडे कोणता धंदा?१ | दाऊदचा मुलगा मोईन दाऊदसोबत कराचीतच राहतो. पण डी कंपनीच्या अफाट संपत्तीचा तोच एकुलता वारस आहे.२ दाऊदचा मुलगा मोईन, त्याचा मरण पावलेला भाऊ तुराचा मुलगा सर्फराज हे ऊर्जा, मिनरल आणि सोन्याचा धंदा सांभाळतात.३ छोटा शकीलचा मुलगा, भारतात राहात असलेल्या दाऊदच्या बहिणीचा मुलगा दुबईत रिअल इस्टेटमधील कोट्यवधींची गुंतवणूक सांभाळतात.४ नुराचा दुसरा मुलगा सोहेल काही वर्षापूर्वीस्पेनमध्ये शस्त्रास्त्रांचा बेकायदा व्यापार करताना पकडला गेला आणि सात वर्षे सुटल्यावर तो दुबईत आला. सध्या तो छोट्या शस्त्रास्त्रांचा बेकायदा धंदा करतो.द ठाण्याच्या तुरुगात असलेल्या इकबाल कासकरचा मुलगा अब्यान हा डी कंपनीचा आयात- निर्यातीचा धंदा सांभाळतो. हा धंदा पूर्ण कायदेशीर राहील, याची काळजी दाऊदने घेतली आहे.६ दाऊदचा मरण पावलेला दुसरा भाऊ मुस्तकीन याच्या मुलीने लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले असून, ती सध्या दुबईत एक लॉ फर्म चालवते.हियांचा व्यापार ही सोन्याची कोंबडी

टॅग्स :Dawood Ibrahimदाऊद इब्राहिम