भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:50 IST2025-09-26T08:46:58+5:302025-09-26T08:50:35+5:30
केंद्राने ड्रग्ज तस्करांविरुद्ध घेतलेल्या कडक भूमिकेमुळे तस्करांना धक्का बसला आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीलाही धक्का बसला आहे. ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे त्यांचे नेटवर्क विस्कळीत झाले आहे.

भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
केंद्र सरकारने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी मोहिम उघडली आहे. यामुळे आता देशातील तस्करांना आता धक्का बसला आहेत. तसेच ड्रग्ज तस्करामध्ये मुख्य सुत्रधार असणाऱ्या दाऊद इब्राहिम टोळीला फटका बसला आहे. अंमली पदार्थ तस्करांवरील कारवाईमुळे त्याचे नेटवर्क कोलमडले आहे.
भारतात विविध प्रदेशांमधील ड्रग्ज कार्टेल सक्रिय आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे दाऊद इब्राहिमचे सिंडिकेट. ते मोडून काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो अजूनही या बेकायदेशीर व्यापाराचा मोठा भाग नियंत्रित करतो. भारतातील कडक कारवाईमुळे दाऊदला त्याची रणनीती बदलण्यास भाग पाडले जात आहे.
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
दाऊद इब्राहिमचा तस्करीमधील पैसा भारतात दहशतवादासाठी वापरला जातो. किमान ८० टक्के दहशतवादी संघटनांना दाऊदच्या नेटवर्कमधून निधी दिला जातो. त्यामुळे, या बेकायदेशीर व्यवसायाचा विस्तार तो करत आहे.
पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा दाऊदला पाठिंबा
पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआय आणि सरकार त्याला पाठिंबा देत आहेत. कारण त्यांना भारतात दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी दाऊदकडून पैशांची आवश्यकता आहे. दाऊदचे नेटवर्क दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील ड्रग्ज कार्टेलपर्यंत पसरले आहे.
दाऊदचा दक्षिण आफ्रिकेत नेहमीच मोठा प्रभाव राहिला आहे, परंतु मेक्सिकन कार्टेल त्याच्यासाठी तुलनेने नवीन आहेत. म्हणूनच, मेक्सिकन नेटवर्क त्याच्यासाठी महत्त्वाचे आहे. २५ नोव्हेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर एका मासेमारी जहाजातून भारतीय तटरक्षक दलाने ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला. तेव्हा मेक्सिकन कार्टेलच्या कारवायांचे संकेत पहिल्यांदाच समोर आले. तेव्हाच या नवीन कार्टेलची भूमिका समोर आली. हे तेच कार्टेल आहेत ज्यांच्यासोबत दाऊद त्याचे नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे.