शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मुली कायम मुली, मुलगा लग्नापर्यंतच मुलगा; वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेस फ्लॅट सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 10:14 AM

९० वर्षांचे विनोद दलाल व ८९ वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी जुहू रोड मुंबई येथे फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपला स्वत:चा राहता फ्लॅट मुलींना भेट म्हणून देऊन टाकला. मुलगा आशिष व त्याच्या पत्नीला हे आवडले नाही व त्यांनी फ्लॅट बळकाविण्यासाठी वृद्ध आई- वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली.

डॉ. खुशालचंद बाहेती -मुंबई: ज्येष्ठ नागरिक कायद्याप्रमाणे मुले आणि नातेवाईकांवर वृद्धांना कोणत्याही त्रासाविना सामान्य जीवन जगण्यासाठी असणाऱ्या गरजा पुरविण्याची जबाबदारी आहे. हा कायदा करण्यामागचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे आहे, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने आई, वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा व सुनेला घर सोडण्याचा आदेश दिला.९० वर्षांचे विनोद दलाल व ८९ वर्षे वयाच्या त्यांच्या पत्नी जुहू रोड मुंबई येथे फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना दोन विवाहित मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपला स्वत:चा राहता फ्लॅट मुलींना भेट म्हणून देऊन टाकला. मुलगा आशिष व त्याच्या पत्नीला हे आवडले नाही व त्यांनी फ्लॅट बळकाविण्यासाठी वृद्ध आई- वडिलांना त्रास देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे आशिषकडे स्वत:चा फ्लॅट व इतर मालमत्ता आहे. मुलगा व सुनेच्या त्रासाला कंटाळून त्यांनी ज्येष्ठ नागरिक संरक्षण प्राधिकरणाकडे अर्ज करून त्यांना घरातून काढून टाकण्याची मागणी केली. प्राधिकरणाने अर्ज मान्य करत मुलास कुटुंबासह फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले.याविरुद्ध मुलाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. अपिलात फ्लॅट मुलींना भेट दिला असल्याने आई वडिलांचा यावर हक्क राहिलेला नाही म्हणून प्राधिकरणाच्या आदेशावर आक्षेप घेतला. हे फेटाळून लावताना उच्च न्यायालयाने यात आई-वडिलांचा हक्क मान्य केला, असहाय वृद्ध आई-वडील आयुष्याच्या शेवटच्या काळात शांततेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या किमान अपेक्षाही सधन मुलाकडून पूर्ण होऊ नयेत काय? हे दु:खद आहे. वृद्ध आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या घरात राहणे हेच त्रास देणे आहे. यामुळे त्यांच्या सामान्य जीवन जगण्याच्या अधिकारांवर गदा येते, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने सून व मुलास फ्लॅट सोडण्याचे आदेश दिले.

न्यायालयाचे मत- या कायद्याची अंमलबजावणी करताना न्यायालये संकुचित किंवा पाण्डित्याची भूमिका घेऊ शकत नाहीत.- सामान्य जीवन जगणे याचा अर्थ व्यापक आहे. त्याचा संबंध ज्येष्ठ नागरिकांसाठी घटनेच्या खंड २१ मधील मुलभूत अधिकाराशी आहे.- या कायद्यात मालमत्ता म्हणजे चल, अचल, वडिलोपार्जित किंवा स्वत: मिळवलेली, मूर्त किंवा अमूर्त या सर्वांचा समावेश होतो.फ्लॅट भेटीत मिळूनही मुलींना आई-वडिलांनी शेवटपर्यंत त्यात राहण्यास हरकत नाही. याउलट मुलगा व सून तो बळकावण्यासाठी त्रास देत आहेत. हे पाहून मुली शेवटपर्यंत मुलीच असतात. मुलगा मात्र लग्न होईपर्यंत मुलगा असतो या म्हणण्यात तथ्य असावे. अर्थात याला अपवाद आहेतच. -न्या. जी. एस. कुलकर्णी 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयMumbaiमुंबई