शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

राफेल खरेदीत भारतीय मध्यस्थाला ८ काेटी ६१ लाख रुपयांचं ‘गिफ्ट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 5:10 AM

भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ मध्ये राफेल विमान खरेदीचा साैदा झाला हाेता. राफेलची उत्पादक कंपनी ‘दसाॅल्ट’ने २०१७ मध्ये ५ लाख ८ हजार ९२५ युराे एवढी रक्कम खात्यातून वळती केली हाेती. याची नाेंद ‘गिफ्ट टू क्लायंट’ या नावाने करण्यात आली हाेती, असा दावा ‘मीडियापार्ट’ने केला आहे.

नवी दिल्ली : भारताच्या महत्त्वाकांक्षी राफेल विमान खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला असून, एका भारतीय मध्यस्थाला ‘दसाॅल्ट’ कंपनीने १० लाख युराे म्हणजे जवळपास ८ काेटी ६१ लाख रुपये ‘भेट’ म्हणून देण्यात आल्याचा दावा फ्रान्समधील एका माध्यम समूहाने केला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली असून, राफेल खरेदी व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

फ्रान्समधील माध्यमसमूह ‘मीडियापार्ट’ने कंपनीच्या ऑडिट रिपाेर्टच्या आधारे हा दावा केला आहे. भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ मध्ये राफेल विमान खरेदीचा साैदा झाला हाेता. राफेलची उत्पादक कंपनी ‘दसाॅल्ट’ने २०१७ मध्ये ५ लाख ८ हजार ९२५ युराे एवढी रक्कम खात्यातून वळती केली हाेती. याची नाेंद ‘गिफ्ट टू क्लायंट’ या नावाने करण्यात आली हाेती, असा दावा ‘मीडियापार्ट’ने केला आहे. फ्रान्सची भ्रष्टाचारविराेधी संस्था ‘एएफए’ने कंपनीच्या खात्यांचे ऑडिट केले हाेते. या संस्थेला त्यावेळी हा घाेटाळा लक्षात आला हाेता. ही रक्कम राफेल विमानाचे ५० रिप्लिका माॅडेल्स तयार करण्यासाठी ही रक्कम देण्यात आली हाेती, असा खुलासा कंपनीने केला हाेता. मात्र, प्रत्यक्षात हे माॅडेल्स तयार केल्याचा काेणताही पुरावा कंपनी देऊ शकलेली नाही, असे ऑडिट रिपाेर्टचा हवाला देऊन ‘मीडियापार्ट’ने म्हटले आहे.ऑडिटमध्ये ही बाब उघड झाल्यानंतरही तपास संस्थेने काेणतीही कारवाई केली नाही. यावरून फ्रान्सची न्यायिक व्यवस्था आणि राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत असल्याचे ‘मीडियापार्ट’ने म्हटले आहे. भारताने २०१६ मध्ये फ्रान्सकडून अत्याधुनिक ३६ राफेल लढावू विमाने खरेदीचा करार केला हाेता. तब्बल ७.८ अब्ज डाॅलर्सचा हा व्यवहार असून, राफेलचे पहिले स्क्वाड्रन अंबाला येथे उभारण्यात आले आहे, तर पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या स्क्वाड्रनची उभारणी सुरू आहे.का दिले? ‘दसॉल्ट’कडे नाही उत्तर‘दसाॅल्ट’ने ‘डेफसीस साेल्यूशन्स’ या भारतीय कंपनीला ५० माॅडेल्स बनविण्याचे काम दिले हाेते. एका माॅडेलसाठी तब्बल २० हजार युराे एवढी माेठी किंमत देण्यात आली. तसेच ५० माॅडेल्सच्या एकूण १० लाख १७ हजार युराे या किमतीच्या अर्धीच रक्कम कंपनीला देण्यात आली. तसेच ‘गिफ्ट’ केलेली रक्कम काेणाला आणि का दिली, याचे उत्तर ‘दसाॅल्ट’ला देता आले नाही, असा दावा ‘मीडियापार्ट’ने केला आहे. ‘डेफसीस’ या कंपनीचे नाव ‘ऑगस्टा वेस्टलँड’ प्रकरणातही आले हाेते. या वृत्तमालिकेत आणखी गंभीर खुलासे करणार असल्याचे ‘मीडियापार्ट’ने सांगितले.

काँग्रेसचा निशाणाराफेल खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आराेप काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये केला हाेता. त्यांनी केलेले आराेप खरे हाेते, असे सांगून काँग्रेसने आता माेदी सरकारवर निशाणा साधला आहे. संरक्षण व्यवहारांमध्ये निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नव्हते का, असा प्रश्न काॅंग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी माैन साेडून हा मध्यस्थ काेण हाेता, हे संपूर्ण देशाला सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. 

टॅग्स :Rafale Dealराफेल डील