2 मुलांचा बाप 3 मुलांच्या आईच्या पडला प्रेमात; लग्न करून घरी आणताच पहिल्या बायकोने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 13:50 IST2023-09-05T13:49:17+5:302023-09-05T13:50:03+5:30
घरी पोहोचल्यावर पहिल्या बायकोला नवऱ्याचं हे प्रेमप्रकरण आवडलं नाही.

2 मुलांचा बाप 3 मुलांच्या आईच्या पडला प्रेमात; लग्न करून घरी आणताच पहिल्या बायकोने...
बिहारमधील दरभंगामध्ये एक अनोखी घटना समोर आली आहे. येथे दोन मुलांचा बाप तीन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला, त्यानंतर त्याने महिलेशी लग्न केलं. महिलेशी लग्न केल्यानंतर तो तिला आपल्या घरी घेऊन गेला. घरी पोहोचल्यावर पहिल्या बायकोला नवऱ्याचं हे प्रेमप्रकरण आवडलं नाही. याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी पती, नवरी आणि सासूला अटक केली. हे प्रकरण जिल्ह्यातील बिरौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
बिरौल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमाही गावातील रहिवासी प्रदीप सदा, जो आधीच विवाहित आहे आणि त्याला मुलं आहेत. तो एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला आणि ती महिला तीन मुलांची आई आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी प्रदीप हा मजूर म्हणून काम करण्यासाठी दिल्लीला नेहमी जात असे, परंतु तेथे त्याचा तीन मुलांच्या आईवर जीव जडला. त्यानंतर तिच्याशी लग्न केलं आणि तिला आपल्या घरी आणलं.
ही बाब पहिली पत्नी अनिला देवीला कळताच तिने विरोध करण्यास सुरुवात केली. इकडे प्रदीप त्याच्या दुसऱ्या पत्नीसह गावी परतल्यावर अनिलाने त्याच्याविरुद्ध पंचायत बोलावली. याबाबत गावात अनेकदा पंचायतही झाली. मात्र यावर कोणताही निर्णय न झाल्याने अनिला देवीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेने तिचा पती प्रदीप सदा, त्याची दुसरी पत्नी सविता देवी आणि सासू अनारकली देवी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीर महिलेने म्हटलं आहे की, 12 वर्षांपूर्वी प्रदीप सदा याच्याशी तिचा विवाह झाला होता. त्यांना पाच आणि तीन वर्षांच्या दोन मुली आहेत. ती आठ महिन्यांची गरोदर आहे. नवरा मजुरीसाठी दिल्लीला गेला होता, जिथे त्याने मुझफ्फरपूरच्या तीन मुलांची आई असलेल्या सविता देवीशी लग्न केलं आणि तिला घरी आणलं. महिलेने सांगितले की, तिने याला विरोध केल्यावर सासरच्यांनी भांडण सुरू केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.