डांगसौंदाणे
By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:06+5:302015-08-11T23:16:06+5:30
डांगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील दगडी साकोडा येथे आदिवासी महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

डांगसौंदाणे
ड ंगसौंदाणे : बागलाण तालुक्यातील दगडी साकोडा येथे आदिवासी महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सुरेखा राजू मोरे (४२) रा. दगडी साकोडे (बागलाण) या महिलेचा मृतदेह येथील वनविभागाच्या क्षेत्रालगतच्या शिवाजी गांगुर्डे यांच्या गट नं. ३४८६ शेतात आढळून आला. सदर घटनेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता सदर महिलेचा खून झाल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले. खून होऊन ३ ते ४ दिवसांचा कालावधी होऊन गेल्याने मृतदेहाची उत्तरीय तपासणी डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज शिवदे यांनी घटनास्थळीच शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या गुन्ाचा तपास पोलीस उपअधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक जी. के. वनारे करीत असून, मयताचा पती हा फरार असल्याने संशयाची सुई त्यांच्या दिशेने फिरत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांनी नाशिक येथील न्याय सहायक प्रयोग शाळेला देत तेथील पथकाला पाचारण करीत मृतदेहाची पाहणी करून नमुने घेतले आहेत. या पथकात जितेंद्र राऊत, प्रमोद पवार, भाऊसाहेब वजारा हे होते. (वार्ताहर)