डेंजरस इश्क! भरधाव स्कूटीवर खतरनाक पद्धतीनं रोमान्स करत होतं कपल, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 22:46 IST2023-01-17T22:45:30+5:302023-01-17T22:46:16+5:30
Social Viral: सोशल मीडियावर अनेकदा रोमान्सचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा हा रोमान्स एवढ्या धोकादायक पद्धतीने आणि खतरनाक ठिकाणी केला जातो, त्यासाठी लोक आपले प्राण पणाला लावतात.

डेंजरस इश्क! भरधाव स्कूटीवर खतरनाक पद्धतीनं रोमान्स करत होतं कपल, व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर अनेकदा रोमान्सचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. मात्र अनेकदा हा रोमान्स एवढ्या धोकादायक पद्धतीने आणि खतरनाक ठिकाणी केला जातो, त्यासाठी लोक आपले प्राण पणाला लावतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये धावत्या स्कूटीवर एक कपल रोमान्स करताना दिसत आहे.
हा व्हिडीओ अनेक युझर्सनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ एका यूट्युब चॅनलवरही शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हा व्हिडीओ लखनौमधील एका ठिकाणचा आहे. मात्र तो लखनौमधील कुठल्या ठिकाणचा आहे याला दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र या व्हिडीओमध्ये एका वर्दळीच्या रस्त्यावर एक तरुण स्कुटी घेऊन जात आहे, तसेच एक मुलगी त्याच्या पुढे बसली आहे.
ही मुलगी मुलग्याच्या दिशेने तोंड करून बसली आहे. तसेच तिने त्या तरुणाला मिठी मारली आहे. तसेच मुलगी त्याला वारंवार किस करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना स्कूटी रस्त्यावरून भरधाव वेगात जात होती. जर थोडासा तोल गेला असता तर दोघेही खाली पडले असते. तसेच त्यांना दुखापत झाली असती. मात्र हे दोघेही स्कूटीवरून भरधाव वेगात जाताना दिसत आहेत.
हा संपूर्ण प्रकार मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे. तसेच तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला, तेव्हापासून प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. आपला जीव धोक्यात घालणे योग्य नाही, असे काही जण म्हणत आहेत. मात्र अशा प्रकारचा व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे.