डल्लेवाल यांचे उपोषण, गैरसमज पसरवू नका; याचिकेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:50 IST2025-01-03T09:50:01+5:302025-01-03T09:50:26+5:30
डल्लेवालांचे उपोषण थांबवा, असे निर्देश आम्ही कधीही दिले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने डल्लेवालांनी दाखल केलेल्या एका नव्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. संबंधित प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे.

डल्लेवाल यांचे उपोषण, गैरसमज पसरवू नका; याचिकेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
नवी दिल्ली : शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल यांच्या उपोषण थांबविण्यासाठी पंजाब सरकारचे अधिकारी व काही शेतकरी नेत्यांकडून गैरसमज पसरविण्यात येत असल्याबद्दल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.
डल्लेवालांचे उपोषण थांबवा, असे निर्देश आम्ही कधीही दिले नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणी दरम्यान न्यायालयाने डल्लेवालांनी दाखल केलेल्या एका नव्या याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. संबंधित प्रकरणाची सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे.
आतिशी यांचा टोला
- दुसऱ्यांना उपदेश देण्याऐवजी सत्ताधारी पक्ष भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोंदींना शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे सांगावे, असा खोचक टोला लगावत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले.
- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लिहिलेल्या एका पत्राचे उत्तर देताना त्यांनी हा टोला लगावला.