शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

दलबीरसिंह सुहाग नवे लष्करप्रमुख

By admin | Updated: May 13, 2014 19:49 IST

निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यावर संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १३ - निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवल्यावर संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी लेफ्टनंट जनरल दलबीरसिंह सुहाग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केली. विद्यमान लष्करप्रमुख विक्रमसिंह हे ३१ जुलैला निवृत्त झाल्यावर सुहाग कार्यभार स्वीकारतील. 
भारतात विद्यमान लष्करप्रमुख निवृत्त होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी नव्या लष्करप्रमुखाच्या नावाची घोषणा केली जाते. लोकसभा निवडणूकीसाठी रणसंग्राम सुरु असताना संरक्षण मंत्रालयाने नवीन लष्करप्रमुखाची शिफारसही केली होती. मात्र भाजपने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. नव्या लष्करप्रमुखाची नेमणूक नव्या सरकारवर सोडावी असे भाजपचे म्हणणे होते. मात्र निवडणूक आयोगाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. यानंतर मंगळवारी संरक्षण मंत्रालयाने लष्कर उपप्रमुख दलबीरसिंह सुहाग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती जाहीर केली. 
कोण आहेत दलबीरसिंह सुहाग
१९७४ मध्ये सैन्याच्या गोरखा रायफल्समध्ये सुहाग दाखल झाले. पूर्वोत्तर भारत व जम्मू - काश्मीर या भागांमध्ये काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. मे २०१२ मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व सध्या भाजपात सक्रीय असलेले व्ही. के. सिंह यांनी सुहाग यांच्यावर निर्बंध घातले होते. आसाममधील एक कारवाई रोखण्यात अपयशी ठरल्याने सुहाग यांच्यावर हे निर्बंध घालण्यात आले होते. मात्र सिंह यांच्यानंतर पदभार स्वीकारणारे विक्रमसिंह यांनी सुहाग यांच्यावरील निर्बंध मागे घेतले. तसेच त्यांना पूर्व विभागाच्या कमांडरपदीही नेमले. ५९ वषीय सुहाग हे सेवाज्येष्ठतेनुसार सर्वात वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांची लष्करप्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली.