शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दलाई लामा यांना देण्यात आली 'Z' सुरक्षा; IB च्या रिपोर्टनंतर गृहमंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 20:04 IST

झेड सुरक्षेअंतर्गत, दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. यात १२ कमांडो आणि ६ पीएसओंचा समावेश असेल. जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. तसेच १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना झेड श्रेणी सुरक्षा देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने दलाई लामा यांच्या सुरक्षिततेसंदर्भात गृह मंत्रालयाला अहवाल सादर केला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

झेड सुरक्षेअंतर्गत, दलाई लामा यांच्या सुरक्षेसाठी आता एकूण ३३ सुरक्षा कर्मचारी तैनात असतील. यात १२ कमांडो आणि ६ पीएसओंचा समावेश असेल. जे त्यांना २४ तास सुरक्षा प्रदान करतील. तसेच १० आर्म्ड स्टॅटिक गार्ड त्यांच्या निवासस्थानी तैनात असतील.

गुप्तचर अहवालात धोक्याचा उल्लेख -दलाई लामा यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशिक्षित चालक आणि देखरेखीसाठी कर्मचारी सेवेवस असतील. याशिवया 12 कमांडो तीन शिफ्टमध्ये त्यांना सुरक्षिवर असतील. दलाई लामा हे 1959 मध्ये चीनविरुद्धचे एक बंड अयशस्वी झाल्यानंतर, भारतात आले होते. गेल्या काही वर्षांपासून गुप्तचर अहवालात चीन समर्थित घटकांसह विविध संस्थांकडून दलाई लामा यांच्या जीवाला संबाव्य धोका असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे त्यांची सुरक्षितता भारतीय अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बनली आहे. 

दलाई लामा यांनी 67 हून अधिक देशांचा दौरा केला आहे -भारत सरकारने दलाई लामा यांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. १९४० मध्ये, तिबेटची राजधानी ल्हासा येथे त्यांना १४ वे दलाई लामा म्हणून मान्यता देण्यात आली. ते गेल्या अनेक वर्षांपासून तिबेटी लोकांच्या न्यायासाठी आवाज उठवत आहेत. १९८९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. त्यांनी सहा खंड आणि ६७ हून अधिक देशांचा दौराही केला आहे. ते जुलै महिन्यात 90 वर्षांचे होत आहेत. 

टॅग्स :Dalai Lamaदलाई लामाHome Ministryगृह मंत्रालय