हनुमानाची भव्य मूर्ती, खांद्यावर राम-लक्ष्मण; जाणून घ्या दक्षिण अयोध्या मंदिराचे ऐतिहासिक महत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 18:16 IST2025-01-19T18:15:43+5:302025-01-19T18:16:35+5:30
Dakshin Ayodhya Mandir: कर्नाटकातील दक्षि अयोध्या मंदिरात महाबली हनुमानाची 72 फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे.

हनुमानाची भव्य मूर्ती, खांद्यावर राम-लक्ष्मण; जाणून घ्या दक्षिण अयोध्या मंदिराचे ऐतिहासिक महत्व
Dakshin Ayodhya Mandir: उत्तर प्रदेशातील अयोध्याप्रमाणे दक्षिण भारतात दक्षिण आयोध्या मंदिर आहे. कर्नाटकातील बंगळुरुमधील श्री दक्षिणा अयोध्यामंदिराच्या प्रांगणात नुकतीच महाबली हनुमानाची 72 फूट उंचीची मूर्ती बसवण्यात आली आहे. ही मूर्ती अतिशय खास आहे, याचे कारण म्हणजे, हनुमानाच्या खांद्यावर श्रीराम आणि लक्ष्मणाच्या मूर्तीदेखील आहेत. राम-लक्षमाला खांद्यावर घेतलीली मूर्ती केवळ भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र नाही, तर कला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
दक्षिण अयोध्या मंदिराचे स्थान आणि महत्त्व
दक्षिण अयोध्या मंदिर बंगळुरुच्या कचरकनहल्ली भागात आहे. हे मंदिर केवळ भव्यतेसाठी प्रसिद्ध नाही, तर ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे. हे दक्षिण भारतातील भगवान रामाच्या उपासनेचे प्रमुख केंद्र मानले जाते.
#WATCH | Karnataka | A 72 feet tall Lord Hanuman statue installed in the premises of Sri Dakshina Ayodhya Kodandarama Temple in Kacharkanahalli, Bengaluru pic.twitter.com/ioYOxUyUqF
— ANI (@ANI) January 19, 2025
मंदिराचा ऐतिहासिक संदर्भ
दक्षिण अयोध्या मंदिराचा इतिहास रघुनाथ नायकाशी जोडलेला आहे. रघुनाथ नायक यांनी दारासुरम परिसरात तलाव खोदला होता. उत्खननात राम आणि माता सीता यांच्या मूर्ती सापडल्या. या मूर्ती स्थापित करण्यासाठी त्यांनी रामास्वामी मंदिर बांधले.
मंदिराचे मुख्य गर्भगृह आणि शिल्पे
मंदिराचे मुख्य गर्भगृह भगवान रामाच्या पट्टाभिराम रूपाला समर्पित आहे. ही मूर्ती भगवान रामाला त्यांच्या राज्याभिषेकाच्या रूपात दाखवते. त्यांच्या डाव्या बाजूला माता सीता बसलेल्या आहेत. मंदिराच्या मुख्य मंडपात भगवान विष्णूच्या विविध रूपांच्या मूर्तीदेखील स्थापित केल्या आहेत, ज्यामध्ये भगवान राम, त्रिविक्रम आणि वेणुगोपाल प्रमुख आहेत.
नायक काळातील चित्रे आणि वास्तुकला
मंदिराच्या प्रांगणात एक उंच खांब असलेला मंडप असून त्यात नायक काळातील रामायणाची चित्रे असायची. कालांतराने ही चित्रे मिटली, पण त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अजूनही कायम आहे.
72 फूट उंचीच्या मूर्तीचे महत्त्व
हनुमानाची ही विशाल मूर्ती मंदिराची ओळख आणखीनच भव्य बनवते. ही मूर्ती भगवान हनुमानाच्या अतुलनीय समर्पण आणि शक्तीचे प्रतीक आहे. या मूर्तीत हनुमान राम आणि लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ही मूर्ती रामायणातील महत्त्वाच्या भागांची आठवण करून देते.