शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Dadra Nagar Haveli By Election 2021 Result: महाराष्ट्राबाहेर पहिल्यांदाच फडकला शिवसेनेचा भगवा, दादरा नगर हवेलीमध्ये कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय, भाजपाचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 4:00 PM

Dadra Nagar Haveli By Election 2021 Result Update: दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार Kalaben Delkar यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी BJP च्या महेशभाई गावित यांचा तब्बल ५१ हजार २६९ मतांनी पराभव केला आहे.

सिल्व्हासा/मुंबई - आतापर्यंत महाराष्ट्रापुरत्या मर्यादित असलेल्या शिवसेनेने आज एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी बाजी मारली आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांचा तब्बल ५१ हजार २६९ मतांनी पराभव केला आहे. कलाबेन डेलकर यांच्या रूपात शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरून पहिला खासदार लोकसभेत पोहोचला आहे. त्यामुळे शिवसेना आणि शिवसैनिकांची दिवाळी अधिकच गोड होणार आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने येथील लोकसभेची जारा रिक्त झाली होती. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्यावरून शिवसेनाही आक्रमक झाली होती. दरम्यान, येथे लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी निवडणुकीचा काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला होता, तर भाजपाकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती.

दादरा नगर हवेली मतदारसंघातील मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या मतमोजणीमध्ये शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. मतमोजणी जसजशी पुढे पुढे सरकत गेली तसतशी कलाबेन यांचा आघाडी वाढत गेली आणि भाजपाच्या विजयाच्या आशा मावळत गेल्या. अखेरीस कलाबेन यांना एकूण १ लाख १८ हजार ०३५ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार महेशभाई गावित यांना ६६ हजार ७६६ मतांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचा उमेदवार याठिकाणी तिसऱ्या स्थानी राहिला. काँग्रेस उमेदवार महेशभाई धोडी यांनी ६१५० मते मिळाली.

दरम्यान, आज दादरा नगर हवेलमध्ये मिळालेल्या या ऐतिहासिक विजयामुळे शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर विस्तार होण्यास मदत होणार असून, आगामी गोवा विधानसभा निवडणुकीतही शिवसेना अधिक जोमाने उतरण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेने ही निवडणूक लढवावी यासाठी आग्रही भूमिका घेणारे आणि डेलकर कुटुंबीयांच्या शिवसेनेतील प्रवेशासाठी पुढाकार घेण्यारे संजय राऊत यांचे वजनही या विजयामुळे वाढणार आहे. 

टॅग्स :dadra-and-nagar-haveli-pcदादरा आणि नगर हवेलीShiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण