धामण सापाला सर्पमित्राकडून जीवदान

By Admin | Updated: January 3, 2016 00:05 IST2016-01-03T00:05:03+5:302016-01-03T00:05:03+5:30

Dada Saapala live by Sarpitarra | धामण सापाला सर्पमित्राकडून जीवदान

धामण सापाला सर्पमित्राकडून जीवदान

>इंदापूर : भक्ष्याच्या शोधार्थ गणेशनगर येथील मनुष्यवस्तीत शिरल्यानंतर कोंबड्यांच्या खुराड्यात फसलेल्या धामण जातीच्या सापाला सर्पमित्राने पकडले. त्यानंतर हा साप निसर्गातच्या सानिध्यात सर्पमित्र अजय बनसुडे याने सोडून दिला.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतचे गणेशनगर हा शहराच्या शेवटच्या टोकाचा भाग आहे. त्याच्या वरच्या भागात शेती आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिक नगण्य, त्यामुळे शेतीची नासाडी करणारे लहान जीव जवळ जवळ लुप्तच झालेले आहेत. त्यामुळे भक्ष्याच्या शोधार्थ आलेली ही धामीण एका रहिवाश्याच्या कोंबड्यांच्या खुराड्यात अडकली. आसपासचे लोक तिला मारण्याच्या पवित्र्यात होते.ही माहिती अजय बनसुडे याला समजल्यानंतर तो तातडीने तेथे पोहोचला.धामीणीची सुटका केली. इंदापूर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातील प्रा. डॉ. राजेंद्र साळुंके यांच्याकडे तिला सुपूर्द केले. त्यांनी तिला वनात सोडले.
-----------------------
फोटो ओळी : इंदापूर गणेशनगर येथे धामण सापाला पकडण्यात आले.
०२०१२०१६-बारामती-१७
-------------------

Web Title: Dada Saapala live by Sarpitarra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.