दाभोलकर, पानसरे हत्या: आठवड्यात आरोपपत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 06:41 IST2019-02-07T06:40:51+5:302019-02-07T06:41:20+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुढील आठवड्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करू, असे सीबीआय व एसआयटीने बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले.

दाभोलकर, पानसरे हत्या: आठवड्यात आरोपपत्र
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुढील आठवड्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करू, असे सीबीआय व एसआयटीने बुधवारी उच्च न्यायालयात सांगितले.
दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआय करीत आहे; तर पानसरे यांच्या हत्येचा तपास एसआयटी करीत आहे. अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनीच दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत, असा दावा सीबीआयने न्यायालयात केला. या दोघांविरुद्ध १३ फेब्रुवारी रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल होईल.