शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जेवण बनवताना सिलेंडरचा स्फोट, दोन घरे उद्ध्वस्त, आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 8:28 AM

Gonda Cylinder Blast: घरात जेवण बनवत असताना गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. तसेच या दुर्घटनेत दोन्ही घरातील १५ जण ढिगाऱ्याखाली दबले जाऊन आठ जणांचा मृत्यू झाला.

गोंडा (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यात एका घरात जेवण बनवत असताना गॅस सिलेंडरचास्फोट होऊन झालेल्या भीषण दुर्घटनेत दोन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. (Gonda Cylinder Blast) तसेच या दुर्घटनेत दोन्ही घरातील १५ जण ढिगाऱ्याखाली दबले जाऊन आठ जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना गोंडा जिल्ह्यातील वजीरगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील टिकरी गावात घडली. दुर्घटनेज जखमी झालेल्या सात जणांना उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर ढिगाऱ्याखाली एक लहान मुलगा दबलेला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (A cylinder Blast while cooking in Gonda, destroying two houses and killing eight people)

या दुर्घटनेत जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत दोन महिला, दोन पुरुष आणि चार मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सात जणांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. टिकरी गावातील नुरुल हसन यांच्या घरात गॅस सिलेंडरचास्फोट होऊन ही दुर्घटना घडली. या स्फोटात शेजारी फकिरे यांचेही घर कोसळले. 

स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आजूबाजूच्या पोलीस ठाण्यामधील फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. त्यानंतर ढिगाऱ्याखालून आठ मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान, स्फोटामागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र स्फोटाची तीव्रता पाहता काहीही अंदाज लावणे कठीण आहे. तपासणी करण्यासाठी फॉरेंसिक टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे.  एसपी संतोष मिश्रा यांनी सांगितले की, जेवण बनवताना स्फोट होऊन घर कोसळल्याची माहिती आम्हाला ११२ कॉलवरून समजली. त्यानंतर पोलीस आणि आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. आठ जणांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी आहेत. 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटUttar Pradeshउत्तर प्रदेश