Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 11:10 AM2021-05-15T11:10:52+5:302021-05-15T11:11:51+5:30

MP Narendra Modi High level meeting's today: कोरोना संकटावर मोदींनी तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच, 12 मे रोजी हायलेव्हल बैठक केली होती. यात कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगसवरदेखील चर्चा झाली होती. 

Cyclone Tauktae, high-level meeting shortly on Corona; Prime Minister Modi will take stock | Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार

Cyclone Tauktae: तौत्के चक्रीवादळ, कोरोनावर हायलेव्हल मिटिंग; पंतप्रधान मोदी आढावा घेणार

Next

Cyclone Tauktae: देशात कोरोनाची (CoronaVirus) रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3,26,098 लाख कोरोनाबाधित सापडले आहेत. तसेच मृतांचा आकडा 4 हजारांवरून खाली 3890 वर आला आहे. जगभरातून भारतातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली जात आहे. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सकाळी 11 वाजता हाय लेव्हल मिटिंग बोलावली आहे. तसेच यानंतर लगेचच तौत्के चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) संकटावरदेखील बैठक घेणार आहेत.  (PM Narendra Modi to chair a high-level meeting today on the Corona Virus and Tauktae  Cyclone related situation and vaccination.)


पहिल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संकटावर आणि लसीकरणाच्या आव्हानावर चर्चा करणार आहेत. सरकार आणि प्रशासनाने काय तयारी केली आहे, याचा देखील आढावा घेतला जाणार आहे. यावेळी अधिकाऱ्यांना लसीकरणामध्ये वेग आणण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे. या बैठकीला आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय आणि नीती आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 




यानंतर लगेचच सायंकाळी 5 वाजता मोदी तौत्के चक्रीवादळाच्या तयारीसाठीदेखील बैठक घेणार आहेत. य बैठकीला सरकारचे वरिष्ठ अधिकारी असतीलच, त्याचबरोबर राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे अधिकारीदेखील असणार आहेत. 
कोरोना संकटावर मोदींनी तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच, 12 मे रोजी हायलेव्हल बैठक केली होती. यात कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगसवरदेखील चर्चा झाली होती. 

Web Title: Cyclone Tauktae, high-level meeting shortly on Corona; Prime Minister Modi will take stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.