Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 12:15 IST2024-12-01T12:09:19+5:302024-12-01T12:15:25+5:30

Fengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा जोरदार तडाखा तामिळनाडून पुद्दुचेरीतील काही भागांना जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडल्याने हाहाकार उडाला. 

Cyclone Fengal: Three killed, water inundated in many areas, Army's help | Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

Cyclone Fengal: तीन जणांचा मृत्यू, अनेक भागात शिरले पाणी, मदतकार्यासाठी लष्कराला पाचारण

Fengal Cyclone Latest News: तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या किनारपट्टी भागातील राज्यांना फेंगल चक्रीवादळाचा तडाखा बसला. चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर अनेक भागात वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळामुळे तीन जणांचा मृत्यू झाला असून, पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एनडीआरएफ बरोबरच लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे.

बंगालच्या खाडीत निर्माण झालेले फेंगल चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. राज्यातील अनेक भागात अतिमुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले.

नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

वादळी वारे आणि अतिमुसळधार पावसामुळे बस, रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली. तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात, तसेच पुद्दुचेरीच्या अडगळीच्या भागात राहणाऱ्या लोकांना बाहेर काढले जात असून, सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. 

मदत बचावकार्यासाठी लष्कराची मदत

भारतीय लष्कराचे जवान बचाव व मदत मोहिमेत सहभागी झाले असून, शनिवारी मध्यरात्रीपासून युद्धपातळीवर मदतकार्य केले जात आहे. पुद्दुचेरीतील कृष्णानगर भागात ५०० घरांमध्ये नागरिक अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी मदत मोहीम राबवण्यात आली. 

फेंगल चक्रीवादळाचा हवाई वाहतुकीला फटका

चक्रीवादळामुळे चेन्नई विमानतळ तब्बल १६ तास बंद ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी ४ वाजता विमानतळ सुरू करण्यात आले. मात्र, हवाई वाहतुकीत प्रचंड अडथळे येत होते. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फेंगल चक्रीवादळ उत्तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टी भागात स्थिर आहे आणि सायंकाळपर्यंत त्याचा जोर कमी होईल. 

चेन्नई आणि आजूबाजूच्या परिसरांमध्ये प्रचंड पाऊस झाला असून, हजारो घरांमध्ये पाणी शिरले आहे. चेन्नईत पावसामुळे करंट लागू तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आठ मदत छावण्या सुरू करण्यात आल्या असून, २०० लोकांना तिथे हलवण्यात आले आहे. त्याचबरोबर २.२३ लाख लोकांना भोजन पुरवण्यात आले आहे. १७०० मोटारीने सध्या शहरातील विविध भागातील पाण्याचा उपसा केला जात आहे, अशी माहिती उदयनिधी स्टॅलिन यांनी दिली. 

Web Title: Cyclone Fengal: Three killed, water inundated in many areas, Army's help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.