शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Ditwah: 'दितवा' चक्रीवादळ कोणत्याहीक्षणी धडकणार; 'या' ३ राज्यांना रेड अलर्ट, ४७ उड्डाणे रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 08:47 IST

Ditwah Cyclone: श्रीलंकेत अनेकांचे कुटंब उद्ध्वस्त करणारे दितवा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात प्रवेश करत भारताकडे सरकत आहे.

नैऋत्य बंगालच्या उपसागरातून उत्तरेकडे सरकत असलेल्या 'दितवा' चक्रीवादळामुळेतामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये हवामानाची परिस्थिती गंभीर झाली असून, जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामानामुळे चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळाने रविवारी एकूण ४७ उड्डाणे रद्द केली. यात ३६ देशांतर्गत आणि ११ आंतरराष्ट्रीय सेवांचा समावेश आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामकाजात अजूनही व्यत्यय येत असून आणखी उड्डाणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी विमानतळावर येण्यापूर्वी संबंधित विमान कंपन्यांचे अपडेटेड फ्लाइट वेळापत्रक तपासण्याचा सल्ला देण्यात आला.

हवामान खात्याचा इशारा

भारतीय हवामान खात्याने तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारी भागांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. चक्रीवादळ आज, ३० नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत तामिळनाडू-पुद्दुचेरी किनाऱ्यालगत सरकेल. हवामान खात्याने चेन्नईसह तामिळनाडूतील आणि पुद्दुचेरीच्या विविध जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. या काळात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका

दितवा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कुड्डालोर, नागापट्टिनम, मयिलादुथुराई, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, पुद्दुचेरी-करैकल, तंजावर, तिरुचिरापल्ली, चेन्नई, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि रानीपेट या भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.  याव्यतिरिक्त, वेल्लोर, धर्मपुरी, दिंडीगुल आणि थेनी येथेही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

नागरिकांना आवाहन

हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, दितवा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी ते अजूनही धोकादायक आहे. हे वादळ सध्या तामिळनाडू-पुद्दुचेरी किनाऱ्याकडे सरकत आहे. दरम्यान, जोरदार वारे आणि उंच लाटांच्या धोक्यामुळे मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये, असा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने आणि जिल्हा प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे, समुद्रकिनारे टाळण्याचे आणि अधिकृत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Cyclone 'Ditwah' imminent: Red alert for 3 states, flights cancelled!

Web Summary : Cyclone 'Ditwah' threatens Tamil Nadu, Puducherry, and Andhra Pradesh, prompting a red alert. Chennai airport cancelled 47 flights due to severe weather. Heavy rainfall is expected in several districts; residents are urged to stay indoors.
टॅग्स :cycloneचक्रीवादळTamilnaduतामिळनाडूpuducherry-pcपुडुचेरीweatherहवामान अंदाज