शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

ममतांच्या आवाहनाला मोदींचा प्रतिसाद; 'अम्फान'चा फटका बसलेल्या भागांचा उद्या दौरा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 21:00 IST

अम्फान चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालचं मोठं नुकसान; आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली/कोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या अम्फान चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. अम्फानचा सर्वाधिक फटका पश्चिम बंगालच्या दक्षिण भागाला बसला आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी उद्या सकाळी साडे दहा वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी करतील. पंतप्रधान पश्चिम बंगालसोबतच ओदिशाचाही दौरा करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली आहे.पंतप्रधान मोदींनी स्वत: पश्चिम बंगालमध्ये येऊन नुकसानाची पाहणी करावी, असं आवाहन संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन बॅनर्जींनी केलं होतं. ममतांच्या या आवाहनाला मोदींनी प्रतिसाद दिला आहे. उद्या मोदी पश्चिम बंगालचा दौरा करून झालेल्या नुकसानाचा आढावा घेतील. अम्फानमुळे राज्यात आतापर्यंत ७२ जणांचा अम्फानमुळे मृत्यू झाल्याची माहिती ममता बॅनर्जींनी संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत कधीच अशा प्रकारचं संकट पाहिलं नसल्याचं त्या म्हणाल्या. अम्फान चक्रीवादळानं पश्चिम बंगालमध्ये हाहाकार माजवला असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. सहा लाख जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. अम्फानमुळे झालेल्या नुकसानाची माहिती मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. 'आतापर्यंत राज्यात ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. मी आतापर्यंत असा विनाश कधीही पाहिला नव्हता. पंतप्रधानांनी पश्चिम बंगालला येऊन स्वत: परिस्थिती पाहावी,' असं आवाहन त्यांनी केलं. अम्फानमुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना अडीच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.अम्फान चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मोदींचं ट्विटअम्फानचा फटका बसलेल्या राज्यांमधील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवून असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली. 'अम्फानमुळे पश्चिम बंगालमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीची दृश्यं पाहिली. या काळात संपूर्ण देश पश्चिम बंगालसोबत आहे. राज्यातील परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'अम्फान'मुळे ७२ जणांचा मृत्यू; मोदींनी स्वत: येऊन परिस्थिती बघावी- ममता बॅनर्जीपुलवामामध्ये दहशतवादी हल्ला, १ जवान शहीद; सीआरपीएफकडून सर्च ऑपरेशन सुरूसीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथपीएम केअर फंडाविरोधात ट्विट करणं काँग्रेसला भोवलं; थेट सोनिया गांधींवर गुन्हा दाखलतिकिटांचे दर निश्चित; देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी सरकार सज्ज

टॅग्स :Cyclone Amphanअम्फान चक्रीवादळNarendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जी