IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 14:23 IST2025-10-02T14:20:48+5:302025-10-02T14:23:39+5:30

Cyclone Alert: बंगालच्या उपसागरात आज रात्री चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

Cyclone Alert: Low-Pressure Area Intensifies, Set to Hit Odisha-Andhra Coast Tonight | IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता चक्रीवादळात रूपांतरित झाला असून, तो वेगाने उत्तर-वायव्य दिशेने किनाऱ्याकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ आज (२ ऑक्टोबर २०२५) रात्रीपर्यंत ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ धडकेल तेव्हा या भागात ताशी ७५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे की, ३ ऑक्टोबर रोजी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटरपर्यंत कमी होईल. परंतु, वादळाचे परिणाम मात्र अनेक दिवस कायम राहतील.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ गोपाळपूर आणि पारादीप किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व उत्तर प्रदेश या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.

ओडिशाच्या किनारी आणि दक्षिणेकडील भागांमध्ये बुधवारपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला. हवामान विभागाने आज राज्यातील सर्व ३० जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला. परिस्थितीचा सामना करण्यासाठी ओडिशा सरकारने संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तातडीने कर्मचारी आणि आवश्यक यंत्रसामग्री तैनात केली. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मच्छिमारांना ३ ऑक्टोबरपर्यंत ओडिशाच्या किनाऱ्याजवळील समुद्रात जाऊ नये, असा स्पष्ट सल्ला दिला आहे. 

Web Title : ओडिशा तट पर चक्रवात का खतरा; आईएमडी ने चेतावनी जारी की

Web Summary : बंगाल की खाड़ी में चक्रवात का खतरा, ओडिशा और आंध्र प्रदेश तट पर आज रात तक पहुंचने की संभावना है। कई राज्यों के लिए भारी बारिश की चेतावनी जारी; मछुआरों को किनारे पर रहने की सलाह। ओडिशा सरकार संभावित प्रभाव के लिए तैयार।

Web Title : Cyclone to Hit Odisha Coast; IMD Issues Warning

Web Summary : A cyclone is developing in the Bay of Bengal, expected to hit Odisha and Andhra Pradesh coasts by tonight. Heavy rainfall warnings issued for several states; fishermen advised to stay ashore. Odisha government prepares for potential impact.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.