शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Cyber Fraud: सॉफ्टवेअर इंजिनिअरने एस्कॉर्ट सर्व्हिसवरुन तरुणी बोलावली; मग जे झाले...पुन्हा विचारही करणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 19:09 IST

Cyber Fraud: आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करुन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि हजारो-लाखो रुपये लुटतात.

डेहराडून: आजकाल सायबर गुन्ह्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या युक्त्या करुन लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि हजारो-लाखो रुपये लुटतात. अशाच प्रकारची एक घटना एका आयटी कर्मचाऱ्यासोब घडली आहे. ऑनलाइन एस्कॉर्ट सेवेच्या प्रकरणात त्याला लाखो रुपये गमवावे लागले. सायबर गुन्हेगारांनी स्वत:ला पोलीस असल्याचे दाखवून त्याला ब्लॅकमेल केले आणि त्याच्याकडून चार लाख रुपये लुटले. 

ऑनलाईन लिंकवर दिली स्वतःची माहितीआयटी कर्मचारी सायबर फ्रॉडला बळी पडल्याची घटना डेहराडूनमधून समोर आली आहे. येथील जुन्या नेहरू कॉलनीत राहणाऱ्या अभिषेक गुप्ता यांनी 7 फेब्रुवारी रोजी इंटरनेटवरील एका वेबसाइटला भेट दिली. तिथे मिळालेल्या एस्कॉर्ट सर्व्हिसच्या लिंकवर जाऊन अभिषेक एकामागून एक माहिती देत ​​राहिला. आधी सेवेचे पैसे भरण्यास सांगितले, त्यावर अभिषेकने 550 रुपये ऑनलाइन पेमेंट केले. यानंतर काही तरुणींचे फोटो पाठवून त्याला एक ठरवण्यास सांगितले. त्याने त्या साईटवर आपली बरीच माहिती दिली.

हॉटेलला फोन केला पण...संभाषणानंतर अभिषेकला ईसी रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर अभिषेकला तिथे कोणीही आढळून आले नाही. यानंतर त्याला फोन करून आणखी काही रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. ही रक्कमही अभिषेकने दिली, त्यानंतरही सेवा न मिळाल्याने तो घरी गेला. यानंतर 9 मार्च रोजी त्याला व्हॉट्सअॅप कॉल आला. पोलीस असल्याचे सांगून धमकावलेकॉल करुन आरोपींनी अभिषेकला पोलीस असल्याचे सांगून धमकावले. जयपूरमध्ये त्याच्यावर मुलगी विकत घेतल्याचा गुन्हा दाखल होणार असल्याची भीती त्याला दाखवली. तसेच, प्रकरण शांत करण्याच्या नावाखाली आरोपींनी त्याच्याकडे 90 हजार रुपयांची मागणी केली. अभिषेकने ही रक्कम आरोपींच्या खात्यावरही पाठवली. आरोपींनी पुन्हा फोन करुन सायबर सेलचे अधिकारी असल्याची बतावणी केली आणि अभिषेकला 4 लाख रुपयांची मागणी केली. अभिषेकने हे पैसे दिले, पण नंतर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्याने नेहरू कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक प्रदीप चौहान यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस