शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
2
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
4
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
5
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
6
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
7
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
8
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
9
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
10
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
11
१८ व्या वर्षी तुमचं मुल होईल कोट्यधीश! SSY, NPS आणि PPF सह 'या' ६ योजनांमध्ये आजच करा गुंतवणूक
12
Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: कसे कराल व्रत? शिवशंकर देतील शुभाशिर्वाद, कल्याण-मंगलच होणार!
14
Delhi Blast : जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
15
विशेष लेख: आळशी मावशी ! केवळ कोंबडीमुळं बिबट्या बिघडला... इकडं धूर.. तिकडं जाळ
16
DSP Siraj Broke Stumps : मियाँ मॅजिक! स्टंप तोड बॉलिंगसह दाखवला 'सायमन गो बॅक'चा खास नजारा (VIDEO)
17
Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!
18
Tips: कामाच्या ठिकाणी होणारे मतभेद मिटवण्यासाठी ६ सोप्या टिप्स!
19
अमेरिकेची धमकी निष्फळ! २.५ अब्ज डॉलर्सची खरेदी करून भारत रशियन तेलाचा दुसरा मोठा ग्राहक
20
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
Daily Top 2Weekly Top 5

Cyber Security: सर्वांचा डेटा आता होणार सुरक्षित, पुढील १८ महिन्यांत नियम आणखी कडक होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 14:07 IST

Cyber Security News: केंद्र सरकारने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचे’ नियम शुक्रवारी अधिसूचित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायद्याचे’ नियम शुक्रवारी अधिसूचित केले असून, देशात प्रथमच डिजिटल प्रायव्हसीला औपचारिक कायदेशीर संरक्षण मिळाले आहे. हे नियम टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, इंटरनेट इंटरमीडियरी, ई-कॉमर्स कंपन्या आणि सर्व डेटा हाताळणाऱ्या संस्थांना पुढील १८ महिन्यांत सर्व नियम पाळावे लागणार आहेत. अन्यथा त्यांना अत्यंत कडक कारवाईला सामोरे जावे लागू शकते. 

डेटा प्रोटेक्शन बोर्ड

दिल्लीमध्ये एक पूर्णपणे डिजिटल पद्धतीने काम करणारा डेटा प्रोटेक्शन बोर्ड स्थापन केला जाणार आहे.  यात एक अध्यक्ष आणि चार सदस्य असतील. नियमांचे उल्लंघन किंवा डेटा लीक झाल्यास हा बोर्ड दंडात्मक कारवाई करेल.  या कायद्यामुळे भारतात प्रथमच डिजिटल गोपनीयतेला मजबूत आणि स्पष्ट संरक्षण मिळाले आहे.

डेटा लीक झाला तर...

डेटा उल्लंघनाची माहिती समजताच ७२ तासांत डेटा प्रोटेक्शन बोर्ड व संबंधित वापरकर्त्यांना कळविणे बंधनकारक आहे.  लीक कसा झाला, त्याचा परिणाम काय, भविष्यातील धोके कोणते आणि ते कमी करण्यासाठी काय उपाय- हे सर्व तपशील द्यावे लागतील.  

काय आहे नवीन बदल?

कोणतीही कंपनी वापरकर्त्यांची परवानगी घेताना त्यांचा डेटा नेमका कसा आणि कुठे वापरला जाईल, याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक. वापरकर्ते कधीही दिलेली परवानगी मागे घेऊ शकतात. माहितीबाबत हक्कभंग झाला असे वाटल्यास डेटा प्रोटेक्शन बोर्डात तक्रार करता येईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Data Security for All: New Rules in 18 Months!

Web Summary : India's digital privacy gets legal protection with the DPDP Act. Organizations handling data must comply within 18 months or face penalties. A Data Protection Board will be established to address violations. Companies must clearly explain data usage, and users can withdraw consent. Data breach notifications must be made within 72 hours.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमonlineऑनलाइन