शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

रशियन लसीच्या चाचणीची परवानगी मिळताच डॉ. रेड्डीजवर सायबर हल्ला; जगभरातील काम ठप्प

By हेमंत बावकर | Updated: October 22, 2020 16:22 IST

Dr. Reddy's Laboratories : काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती.

भारताची मोठी फार्मासिटीकल कंपनी डॉ. रेड्डीजवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. यामुळे कंपनीने जगभरातील कारखान्यांमधील काम थांबविले आहे. कंपनीचा डेटा धोक्यात असल्याने सर्व्हरमधील माहिती हल्लेखोरांना न मिळण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. पुढील 24 तासांत पुन्हा काम सुरु होईल असे कंपनीने म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वीच डॉ. रेड्डीजला भारत सरकारने रशियाच्या स्पुतनिक व्ही या जगातील पहिल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यास परवानगी दिली होती. या नंतर हा सायबर हल्ला झाल्याने य़ा दृष्टीनेही पाहिले जात आहे. हा सायबर हल्ला झाल्यानंतर बीएसईवर कंपनीच्या शेअरमध्ये 4 टक्क्यांची घसरण झाली. डॉ रेड्डीजचा शेअर आता 4832 रुपयांवर आहे. थोड्या वेळाने पुन्हा काहीशी वाढ झाली. दुपारी 1.30 वाजता कंपनीचे शेअर 4985 रुपयांवर आले होते. 

कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, सायबर हल्ला झाल्याने कंपनीने  सर्व डेटा सेंटर आयसोलेट केले आहेत. Dr Reddy's चे भारत, रशिया, ब्रिटन, अमेरिकेसह ब्राझीलमध्ये कारखाने आहेत. कंपनीवर हा सायबर हल्ला बुधवारी रात्री 2.30 वाजता झाला आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश राठी म्हणाले की, “सायबर हल्ला झाल्यामुळे, आम्ही आवश्यक माहिती बचाव कार्य म्हणून सर्व डेटा सेंटर वेगळे केले आहेत. आम्हाला आशा आहे की पुढील 24 तासांमध्ये सर्व सेवा सुरू होतील. या घटनेमुळे आमच्या कामावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.''

कोरोना लसीची चाचणीडॉ. रेड्डीज आणि आरडीआयएफ यांना काही दिवसांपूर्वी भारतात स्पुतनिक व्ही लसीच्या क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी मिळाली आहे. रेड्डीज ही कंपनी हैदराबादची आहे. भारतातील स्पुतनिक व्ही लसच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांसाठी ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) कडून मान्यता प्राप्त झाली आहे. मागील महिन्याच्या सप्टेंबरमध्ये, डॉ. रेड्डीज आणि आरडीआयएफने स्पुतनिक व्ही लसची क्लिनिकल चाचणी आणि त्यास भारतात वितरण करण्याबाबत करार केले होते. भागीदारीचा एक भाग म्हणून, आरडीआयएफ नियामक मान्यतेनंतर डॉ. रेड्डीजची लसीचे 10 कोटी डोस भारतात देणार आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाshare marketशेअर बाजार