शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

गुजरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 10:50 PM

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी बोलाविली आहे. ही निवडणूक गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान ९ डिसेंबर रोजी होण्याआधी पार पडेल आणि सध्या उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी औपचारिकपणे पक्षाची धूरा हाती घेतील, हे आता नक्की मानले जात आहे.

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी बोलाविली आहे. ही निवडणूक गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान ९ डिसेंबर रोजी होण्याआधी पार पडेल आणि सध्या उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी औपचारिकपणे पक्षाची धूरा हाती घेतील, हे आता नक्की मानले जात आहे.बरोब्बर एक वर्षापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनी सूत्रे हाती घ्यावी, अशी एकमुखी विनंती केली होती. त्यानंतर पक्षाच्या निवडणुका झाल्या. पण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक मात्र लांबणीववर पडत गेली होती. शिवाय स्वत: राहुल गांधींनी नेमणुकीपेक्षा निवडून येण्याचा आग्रह धरला होता.

पक्षाच्या सूत्रांंनी दिलेल्या माहितीनुसार एम. रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने आता या निवडणुकीसाठी विविध संभाव्य तारखांचा कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतादन व निकाल जाहीर करण्यापर्यंतचे सर्व टप्पे १२ ते १४ दिवसांत पूर्ण होऊ शकतील, अशी तरतूद आहे. यापैकी नेमक्या कोणत्या तारखेला निवडणूक घ्यायची हे ठरविण्याचा अधिकार कार्यकारिणीस असला तरी गुजरात निवडणुकीच्या आधी पूर्ण होईल, असा निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे दिसते. यानुसार राहुल गांधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्षपदी निवडून येऊ शकतील.

सन २००४ मध्ये सक्रिय राजकारणात आलेल्या राहुल गांधींना सन २०१३ मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष केले गेले. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे पक्षाचा कारभार लौकिक अर्थाने तेच चालवीत होते. आता गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचाराची धूराही तेच मोठ्या आक्रमकतेने सांभाळत आहेत. सोनियाजी मार्गदर्शकसन १९८९ पासून काँग्रेस अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक दीर्घकाळ पदावर राहिलेल्या पक्षाध्यक्षा आहेत. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यावर सोनिया गांधींची पक्षात भूमिका कोणती राहील याचाही निर्णय सोमवारी होईल की त्यासाठी कार्यकारिणीची नंतर वेगळी बैठक होईल, हे लगेच स्पष्ट झाले नाही. तरीही सोनियाजी पक्षाच्या मार्गदर्शक व काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी कायम राहतील, असे संकेत पक्षातून मिळाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस